Hydraulic Ladder खरेदीतील गोंधळ आणखी वाढला | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hydraulic ladder reference image

Hydraulic Ladder खरेदीतील गोंधळ आणखी वाढला

नाशिक : हायड्रोलिक शिडी खरेदीचे कंत्राट देण्यात आलेल्या फायर स्केम कंपनीने पटाया येथे युनिट विक्री केल्याचा दावा केला असला तरी मुळात अशा प्रकारचे कुठलेही टेंडर काढण्यात आले नसल्याचे पत्रच तक्रारदाराच्या हाती पडल्याने एकूणच शिडी खरेदीतील गोंधळ अधिक वाढला आहे. (Confusion in purchasing Hydraulic Ladder increased nmc latest marathi news)

शहरातील उंच इमारतीमधील आग विझविण्यासाठी अग्निशमन यंत्रणा बळकट बळकट करणे आवश्यक आहे. त्यासाठी ९० मीटर उंचीचा हायड्रोलिक प्लॅटफॉर्म अर्थात शिडी खरेदी करण्यासाठी महापालिकेकडून प्रक्रिया राबविण्यात आली.

फायर स्केम नावाच्या कंपनीला काम देण्यात आले. नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्तीनुसार काम दिले नसल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिडी खरेदीमध्ये अनियमितता असल्याच्या बाबी समोर येत आहे.

१४ जुलैला निविदा प्रसिद्ध करण्यात आली. निविदांसाठी प्रीबीड पॉइंट्स सबमिशनची परवानगी १६ जुलैपर्यंत देण्यात आल्याने शिडी खरेदी संदर्भात पहिला संशय व्यक्त करण्यात आला. निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर दहा दिवसांचा कालावधी दिला जातो मात्र, हायड्रोलिक शिर्डी खरेदीच्या निविदा प्रक्रियेत दोनच दिवसांचा कालावधी देण्यात आला.

हेही वाचा: मंदीची चाहूल : कर्ज घेऊन प्रकल्प उभारणारे संकटात सापडण्याची चिन्हे

अग्निशमन व बचावाच्या दृष्टीने ब्रोटोसकाय लिफ्ट ही एकमेव कंपनी अस्तित्वात असताना निविदा प्रक्रियेतील अटी व शर्ती बदलण्यात आल्या. हायड्रोलिक शिर्डीचे स्पेअर पार्ट भारतात उपलब्ध नाही. शिडी खरेदी केल्यानंतर वॉरंटी व देखभाल दुरुस्तीसाठी अन्य देशांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्याशिवाय शासनाच्या फायर सर्व्हिसेसच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले नसल्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

प्रक्रिया रद्द झाल्याचे पत्रच सादर

परदेशात हायड्रोलिक शिडी विक्रीचा अनुभव अटी व शर्तीमध्ये नमूद करण्यात आला होता. त्यानुसार थायलंड येथे हायड्रोलिक युनिट विक्री करण्यात आल्याचे कागदपत्र दाखविण्यात आले होते. परंतु, तक्रारदाराने आयुक्तांकडे सादर केलेल्या तक्रारीत पटाया येथे अशा कुठल्याही प्रकारची शिर्डी खरेदी केली नाही. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे पत्रच सादर केल्याने हायड्रोलिक शिर्डी खरेदी संदर्भात दाट संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: Dhule : जिल्ह्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या 431 मुलीमुलांना अनुदान मंजूर

Web Title: Confusion In Purchasing Hydraulic Ladder Increased Nmc Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashiknmcFirefighters