bribe crime Sakal
नाशिक

Nashik Bribe Crime: 5 हजाराची लाच घेताना महापालिका मुकादमास अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : शहरातील प्रभाग क्रमांक तीनच्या कार्यक्षेत्रातील जमजम प्राथमिक शाळा व जन्नत माध्यमिक विद्यालयाच्या अनाधिकृत बांधकाम संदर्भात कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करावा व अनधिकृत बांधकाम अतिक्रमण प्रकरणी कारवाई करावी यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना महानगरपालिका प्रभाग तीनचे बीट मुकादम मनोहर बाबूलाल ढिवरे (वय ४५) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

नाशिक विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. (malegaon Municipal court arrested for accepting bribe of 5 thousand Nashik Bribe Crime)

शहरातील सामाजिक कार्यकर्त्याने जमजम प्राथमिक शाळा व जन्नत विद्यालयाच्या अनधिकृत बांधकाम संदर्भात अर्ज व तक्रार केली होती.

त्याबाबतचा प्रस्ताव पाठविणे व कारवाईसाठी मनोहर ढिवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली.

तडजोडीनंतर पाच हजार रुपये स्वीकारण्याची तयारी श्री. ढिवरे यांनी दर्शवली. गुरुवारी (ता.२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल, दत्त मंदिर परिसरात लाचेची रक्कम स्वीकारताना श्री. ढिवरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.

पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी, उपअधिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नाना सूर्यवंशी, हवालदार सचिन गोसावी, शरद हेंबाडे, पोलिस नाईक विलास निकम, परशुराम जाधव आदींनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT