suraj mandhare esakal
नाशिक

नाशिकमधील सर्व मॉल्स सोमवार पासून बंद : जिल्हाधिकारी

विनोद बेदरकर

नाशिक : शनिवारी व रविवारी लग्नसमारंभासाठी दिलेली सवलत या आठवड्याच्या शेवटच्या शनिवारी-रविवार नंतर संपुष्टात येईल. (3 व 4 जुलै) त्यानंतर लग्न समारंभ सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत करता येतील असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. (malls-in-nashik-closed-from-monday-dm-Suraj-mandhare-marathi-news)

प्रशासकीय यंत्रणा सतर्क

राज्यात कोरोनाचा संसर्ग (Corona Virus) दर (पॉझिटीव्हीटी रेट) पाच टक्क्यांच्या आत असलेल्या जिल्ह्यांचा समावेश वर्ग दोनमध्ये करून तेथील बहुतांश कामकाज सुरू झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी तिसऱ्या वर्गातील नाशिकचा संसर्ग दर या आठवड्यात तीन टक्क्यांच्या आत आला आहे. २.८ टक्के संसर्गदर कमी झाला असला, तरी राज्यात डेल्टा प्लस विषाणूच्या अनुषंगाने राज्य सरकारने काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व डेल्टा प्लस विषाणूंचे गांभीर्य लक्षात घेता व नागरिकांच्या विनाकारण गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.

तिहेरी संकटाची धास्ती

लॉकडाउनचे (Lockdown) निर्बंध शिथिल झाल्यानंतर त्याचा थेट रस्त्यावर परिणाम दिसतो. नागरिकांची प्रचंड गर्दी होते. संसर्गदर घटल्याच्या आनंदापेक्षा बेसुमार गर्दीमुळे रस्त्यावरून नागरिकांचा वावर जास्त धोकादायक वाटत आहे. आता तिसरी संभाव्य लाट आणि डेल्टा प्लस या नव्याने येणाऱ्या विषाणूची चर्चा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी, डेल्टा प्लस आणि संभाव्य लाट अशा तिहेरी अडचणीचा सामना करण्याचे आव्हान आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील कोरोना संसर्गचा दर कमी होऊनही विषाणूंच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात लागू केलेल्या निर्बंधामध्ये बदल करण्याच्या मनस्थितीत प्रशासकीय यंत्रणा नाही.

(malls-in-nashik-closed-from-monday-dm-Suraj-mandhare-marathi-news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : दिल्ली पोलिसांकडून 'एक्सपायर्ड' अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ५३ कोटींचा खर्च; क्रीडा मंत्रालयाकडून ॲथलेटिक्स, बॉक्सिंगला प्राधान्य

'देशविरोधी शक्तींनी आंदोलन हायजॅक करू नये' दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर प्रीती झिंटा म्हणाली...'आंदोलनाचा गैरफायदा घेऊ नका'

Live Updates Marathi : महादेव जानकर, राजू शेट्टींनी घेतली आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट

Amravati News: शासकीय योजनेतील विहीर गेली चोरीला; गावकऱ्यांची पोलिस ठाण्यात धाव

SCROLL FOR NEXT