सावधान! नाशिक शहरात दीड वर्षात 54 मुले बेपत्ता

children missing
children missingesakal
Updated on

नाशिक : शहर व परिसरातील विविध भागांतून दीड वर्षात सुमारे ५४ मुले बेपत्ता झाली आहेत. त्यात अल्पवयीन मुलींचे प्रमाण सर्वाधिक असून, बहुतांश अल्पवयीन मुली प्रेमप्रकरणाच्या आमिषाला बळी पडून बेपत्ता झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. यामुळे पोलिस प्रशासन प्रत्येक पालकाला पाल्यांचे मोबाईल तपासा, असा संदेश देत आहे. (54-children-missing-in-Nashik-marathi-news)

अल्पवयीन मुलींना फूस लावण्याच्या प्रकारात वाढ

नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत शहरातून अल्पवयीन मुले-मुली पळून जाण्याचे किंवा नेण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षी ३७, तर यंदा १७ अशा दीड वर्षात ५४ घटना उघडकीस आल्या आहेत. अल्पवयीन पळून गेलेल्या मुलांना शोधून त्यांच्या पालकांच्या ताब्‍यात देण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र ही आकडेवारी वाढण्यामागे सर्वांच्या हातातील मोबाईल हे प्रमुख कारण असल्याचे पुढे येत आहे. पोलिसांनी दीड वर्षात घडलेल्या घटनांचा मागोवा घेतला असता, यात बेपत्ता होणाऱ्यांत अल्पवयीन मुलींचे प्रमाण अधिक आहे. त्यातही बहुतांश मुलींना फूस लावून पळून नेण्यात आल्याचे समोर आले आहे.

लॉकडाउन अन् मोबाईल

कोरोना महामारीत लॉकडाउन संकल्पना सुरू झाली. या काळात शाळा-महाविद्यालये बंद झाल्याने ऑनलाइन अभ्यास सुरू झाला. ऑनलाइन अभ्यासासाठी पालकांनी मुलांना मोबाईल घेऊन दिले. साहजिकच मोबाईल हाताशी आल्याने अभ्यासानंतरच्या फावल्या वेळात अल्पवयीन मुली प्रेमप्रकरणाच्या नावाखाली बळी पडू लागल्याचे वास्तव दीड वर्षात पोलिस तपासात पुढे आले आहे.

नाशिकमधील चित्र

३७ - सन २०२०

१७ - सन २०२१ (३१ मेअखेर)

- लॉकडाउनमध्ये ऑनलाइन अभ्यास

- ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाईल

- बेपत्ता होणाऱ्यांत अल्पवयीन मुली अधिक

- फूस लावण्याच्‍या घटनांत मुलीच लक्ष्य

children missing
नाशिकमध्ये संसर्ग दर घटूनही निर्बंध ‘जैसे थे’

कुमारवयीन मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. बहुतांश मुली प्रेमाच्या आमिषाला बळी पडून किंवा फूस लावून पळून गेल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल देणाऱ्या पालकांनी अल्पवयीन मूल कळत नकळत चुकीच्या गोष्‍टीच्या आहारी चालले आहे का? यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. - संजय बारकुंड, पोलिस उपायुक्त, गुन्हे शोध विभाग

children missing
नाशिकच्या कांदा भावात घसरण; आखाती देशात आव्हान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sinnar Samruddhi Expressway robbery
Nashik Kumbh Mela
Nashik Shalarth Scam
Nashik tourists stranded in Nepal flood
Marathi News Esakal
www.esakal.com