MHT CET  esakal
नाशिक

MHT CET 2023 : एमएचटी सीईटी परीक्षा नोंदणीची 'या' तारखेपर्यंत मुदत; या आहे महत्त्वा‍च्‍या तारखा..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बारावीनंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी- २०२३ (MHT CET 2023) या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी अर्जप्रक्रिया बुधवारी (ता. ८) सुरू झाली. (MHT CET 2023 Exam Registration deadline is April 7 nashik news)

पात्र विद्यार्थ्यांना येत्‍या ७ एप्रिलपर्यंत ऑनलाइन परीक्षा अर्ज भरता येणार आहे. राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे यासंदर्भात सूचनापत्र जारी करून एमएचटी-सीईटी २०२३ परीक्षेची नोंदणी सुरू झाल्‍याचे जाहीर केले आहे.

अभियांत्रिकी (बी.ई./बी.टेक.), औषधनिर्माणशास्‍त्र (बी. फार्मसी), कृषी (बी. एस्सी, ॲग्री.) या पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ही परीक्षा होणार आहे. भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि गणित (पीसीएम), तसेच भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) अशा दोन ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्‍ध असणार आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

मेमध्ये परीक्षा

एमएचटी-सीईटी परीक्षा मेमध्ये होईल. यामध्ये पहिल्‍या टप्‍यात पीसीएम ग्रुपची परीक्षा ९ ते १३ मे यादरम्यान, तर पीसीबी ग्रुपची परीक्षा १५ ते २० मेदरम्यान होईल. संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) या परीक्षेत विद्यार्थ्यांना सत्रनिहाय परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. परीक्षेची तारीख, वेळ व परीक्षा केंद्राचा पत्ता प्रवेशपत्रावर नमूद केला जाईल. परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर केला जाईल.

महत्त्वा‍च्‍या तारखा अशा-

एमएचटी-सीईटी परीक्षा नोंदणीची मुदत---------७ एप्रिल

विलंब शुल्‍कासह नोंदणीची मुदत--------------८ ते १५ एप्रिल

ऑनलाइन शुल्‍क भरण्याची मुदत--------------१६ एप्रिल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : पुणे -मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT