NEET Exam : नीट परीक्षा नोंदणीची 'या' तारखेपर्यंत मुदत; असे असेल परीक्षेचे स्वरूप..

NEET Exam Latest Marathi news
NEET Exam Latest Marathi newsesakal
Updated on

नाशिक : वैद्यकीय शाखेतील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी नॅशनल इलिजिब्‍लिटी कम एंट्रान्‍स टेस्‍ट (NEET) परीक्षा घेतली जाणार आहे. (NEET exam Deadline for registration is 6 April nashik news)

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी ७ मेस ‘नीट २०२३’ परीक्षा देश -विदेशातील परीक्षा केंद्रांवर पार पडेल. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून, इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना ६ एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी यांच्‍यामार्फत या बाबत नुकतेच सूचनापत्र जारी केले आहे. त्‍यानुसार नीट २०२३ परीक्षेकरीता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया काल (ता.६) पासून सुरू झाली आहे. इयत्ता बारावीची परीक्षा देत असलेल्‍या पात्रताधारक विद्यार्थ्यांना ६ एप्रिलच्‍या रात्री नऊपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल. तर याच दिवशी मध्यरात्री बारापूर्वी विद्यार्थ्यांना निर्धारित शुल्‍क ऑनलाइन स्वरूपात अदा करावे लागणार आहे.

असे असेल परीक्षेचे स्वरूप

परीक्षेत दोनशे प्रश्‍न वस्‍तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे विचारले जातील. भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (बॉटेनी व झुऑलॉजी) या विषयांचे प्रत्‍येकी पन्नास प्रश्‍न संच अ व संच ब च्‍या माध्यमातून परीक्षेला विचारले जातील.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

अ गटातील सर्व ३५ प्रश्‍न सोडविणे बंधनकारक असेल. तर ब गटात दिलेल्‍या पंधरा प्रश्‍नांपैकी कुठलेही दहा प्रश्‍न सोडवायचे असतील. प्रश्‍नपत्रिका सोडविण्यासाठी तीन तास २० मिनिटे कालावधी उपलब्‍ध असेल.

प्रत्‍येकी चार गुणांसाठी अशी एकूण ७२० गुणांसाठी ही परीक्षा होणार असून प्रत्‍येक चुकीच्‍या उत्तरासाठी एक गुणाची कपात केली जाईल. विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दुसह वेगवेगळ्या तेरा भाषांमधून प्रश्‍नपत्रिका सोडविण्याचा विकल्‍प उपलब्‍ध करून दिला आहे.

राज्‍यातील या परीक्षा केंद्रावर होणार परीक्षा

नाशिक, पुणे, मुंबईसह नगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलडाणा, जळगाव, कोल्‍हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नवी मुंबई, सातारा, सोलापूर, ठाणे, सांगली, सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी, धुळे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, उस्‍मानाबाद, पालघर, परभणी,

NEET Exam Latest Marathi news
Womens Day 2023 : आदिवासी आश्रमशाळेच्या शिक्षिकेची 3 दिवसात 350 कि.मी.ची सायकलवारी!

रायगड, वर्धा, वाशीम, यवतमाळ, मालेगाव या शहरांतील परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने (पेन व पेपरवर आधारित) परीक्षा येत्‍या ७ मेस दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजून २० मिनिटे यादरम्‍यान पार पडणार आहे.

अर्ज भरताना या गोष्टींची घ्या काळजी..

* वैयक्‍तिक माहिती दाखल करताना अचूक असल्‍याची खात्री करा.

* अर्ज भरण्यापूर्वी सूचनापत्रातील सूचना व्‍यवस्‍थित वाचा.

* अर्ज भरण्यासाठी आवश्‍यक बाबींची तरतूद करून मग अर्ज भरा.

* अर्ज भरून झाल्‍यावर अर्ज क्रमांक व पासवर्ड जतन करून ठेवा.

* अर्ज क्रमांक किंवा पासवर्डबाबतची माहिती गोपनीय ठेवा.

* अर्ज भरताना परीक्षा केंद्र शहराचा पर्याय काळजीपूर्वक निवडा.

* वेळोवेळी जारी केल्‍या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवा.

NEET Exam Latest Marathi news
Womens Day 2023 : जिल्हा परिषद प्रशासनाची दोरी सावित्रीच्या लेकींच्या हाती!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com