vinayak mete 1.jpg 
नाशिक

"तिथीनुसार शिवसैनिकांनी शिवजयंती केल्यास दुटप्पीपणा"

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जातील. तेव्हा राज्यात एकच शिवजयंती साजरी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली. तसेच, शिवसैनिकांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा दुटप्पीपणा स्वीकारल्यास तो मुख्यमंत्र्यांना शोभणारा नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळाले, पण त्याचा फायदा समाजाला होत नाही

शिवसंग्रामचा  वर्धापन दिनाचा सोहळा 8 फेब्रुवारीला दुपारी साडेतीनला परेल, मुंबई येथील नरे पार्क मैदानावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याच्या तयारीच्या बैठकीसाठी नाशिकमध्ये आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण मिळाले. पण, त्याचा फायदा समाजाला होत नाही. नियुक्तिपत्र देऊनही नोकरी न मिळाल्याने आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती तत्काळ द्यावी. त्याचप्रमाणे सारथी संस्थेच्या अनागोंदी कारभाराची सखोल चौकशी करावी. संस्थेसाठी चांगली समिती द्यावी. संस्थेचा थांबलेला निधी पुन्हा सुरू करून शिष्यवृत्ती देण्याची व्यवस्था करावी. 
 

गड-किल्ल्यांसाठी राज्याची व्यवस्था आवश्‍यक 
गड-किल्ल्यासंबंधी राज्य सरकारने स्वीकारलेल्या धोरणाचे मी स्वागत करतो. मात्र, त्यात सुरक्षाव्यवस्था, केंद्रीय विभागाच्या ताब्यातील गड-किल्ल्यांसाठी स्वतंत्र दल याची स्पष्टता नाही. केंद्राकडून महाराष्ट्राने सगळे किल्ले ताब्यात घ्यावेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे. त्या माध्यमातून पुनर्विकास, दुरुस्ती, व्यवस्था आणि पावित्र्य राखणे अशी व्यवस्था करावी. 2005 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे यासंबंधाने मी मागणी केल्यावर एक बैठक झाली. मात्र, पुढे काहीही झालेले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India: हवेतच घडला थरार... दिल्लीला जाणारं एअर इंडियाचं विमान ३०० फूट खाली, १० प्रवासी अन् ४ कर्मचारी जखमी! नेमकं काय घडलं?

IND vs SL : भारतीय संघ श्रीलंकेसाठी रवाना, विमानतळावर 'एक' फलंदाज नाही दिसला; दौऱ्याला मुकण्याची शक्यता... जसप्रीतनंतर आणखी एक धक्का?

Pune Water Supply Update : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीकपात पूर्णपणे रद्द, खडकवासला धरण क्षेत्रात मुबलक पाणीसाठ्यामुळे मिटली चिंता

Satej Patil emotional post for father : सतेज पाटलांची वडिलांसाठी भावनिक पोस्ट, 'आधारवड हरपला..! दादांनी आयुष्यभर माणसं जोडली'

Marathi Live Updates News: ई-२० शकिराच्या भारत दौऱ्याची चर्चा; पुण्यातही रंगणार संगीताचा जल्लोष?

SCROLL FOR NEXT