धक्कादायक! क्लासमध्ये 'ती" शिकवायची मुलांना..बऱ्याच वेळानंतर क्लासचा दरवाजा उघडला तेव्हा धक्काच...

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 3 February 2020

तेजस्विनी राकेश भामरे असे विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी उच्चशिक्षित असून, राहत्या ठिकाणी त्या इंग्लिश स्पीकिंग आणि शालेय विद्यार्थ्यांचे क्‍लास घ्यायच्या. रविवारी सकाळी साडेआठ ते साडेदहापर्यंत त्यांनी क्‍लास घेतला. क्‍लासच्याच वर त्यांचे घर होते. अकराच्या सुमारास क्‍लासरूम उघडण्यासाठी शालेय मुलगा चावी घेण्यासाठी घरी आला असता त्यालाही धक्का बसला.

नाशिक : अशोकनगर येथील उच्चशिक्षित विवाहितेने खासगी क्‍लासरूममध्येच गळफास घेत आत्महत्या केली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला असता, तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हणत तिच्या माहेरच्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सातपूर पोलिसांनी विवाहितेचा पती व दिराला ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला. या प्रकरणी सातपूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

असा घडला प्रकार

तेजस्विनी राकेश भामरे (वय 26, रा. इंद्रायणी रो-हाउस, संभाजीनगर, अशोकनगर, सातपूर) असे विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी उच्चशिक्षित असून, राहत्या ठिकाणी त्या इंग्लिश स्पीकिंग आणि शालेय विद्यार्थ्यांचे क्‍लास घ्यायच्या. रविवारी (ता. 2) सकाळी साडेआठ ते साडेदहापर्यंत त्यांनी क्‍लास घेतला. क्‍लासच्याच वर त्यांचे घर होते. अकराच्या सुमारास क्‍लासरूम उघडण्यासाठी शालेय मुलगा चावी घेण्यासाठी घरी आला असता, दीर मनीष भामरे याने चावी दिली. मुलाने क्‍लासरूम उघडला असता, तेजस्विनी भामरे यांनी क्‍लासरूममध्ये ओढणीने सीलिंग फॅनला बांधून गळफास घेतलेला होता. ही माहिती मिळताच भामरे कुटुंबीयांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून तेजस्विनीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी रवाना केला. दरम्यान, तेजस्विनी यांच्या नातलगांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत गोंधळ घातला. तेजस्विनीचा मृत्यू संशयास्पद असून, तिच्या सासरच्यांनी तिचा खून केल्याचा आरोप केला. तसेच पोलिसांनीही पंचनामा करण्यापूर्वीच तिच्या सासरच्यांनी पुरावे नष्ट केल्याचाही आरोप करीत शवविच्छेदन रोखले.

हेही वाचा > 'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी! 

पोलीसांनी नातलगांची समजूत काढली...

या वेळी सहाय्यक पोलिस आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी, सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांनी नातलगांची समजूत काढली, तसेच पोलिसांनी या प्रकरणी विवाहितेचा पती राकेश व दीर मनीष भामरे या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला. दरम्यान, शवविच्छेदनामध्ये विवाहितेचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी सातपूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

हेही वाचा >  PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married woman suicide in coaching classroom Nashik Crime Marathi News