amit thackeray 
नाशिक

सर्वांचा हिशेब चुकता करणार! नाशिकमध्ये झळकले मनसेचे पोस्टर्स

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : 'सर्वांचा हिशेब चुकता करणार' असे पोस्टर्स नाशिकमध्ये सध्या ठिकठिकाणी लावलेले दिसून येत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या (Nashik Municipal Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) युवा नेते आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit thackeray) चार दिवसांच्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. या निवडणुकांसाठी मनसेने चांगलीच कंबर कसली असल्याचं यावरुन दिसून येत आहे. अमित ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान नाशिकमध्ये जोरदार पोस्टरबाजी झाल्याचंही दिसून आलं.

सर्वांचा हिशेब चुकता करणार! अमित ठाकरें दौरा अन् पोस्टरबाजी

कोणतंही सरकार कायम नसतं, लोक बघत असतात कोण काम करतंय आणि कोण नाही. लोक सूज्ञ असतात, असं म्हणत अमित ठाकरे यांनी नाशिकच्या मैदानात पहिली गर्जना केली.अमित ठाकरे यांच्या सोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर ,संदीप देशपांडे, अमेय खोपकर हे देखील या दौर्‍यात सहभागी होणार आहेत. दरम्यान दुपारी बारा वाजल्यापासून शहराच्या तीनही विभागांमध्ये बैठकांचा आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये पदाधिकार्‍यांशी चर्चा आणि शाखा अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मनसे कार्यालयाबाहेर (mns office) कार्यकर्त्यांची लगबग आहे. दरम्यान, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे (amit theckeray) यांनी आज (ता.२७) माध्यमांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT