पोलिसांना सापडत नसलेले फरार कार्यकर्ते राऊत यांच्या भेटीला?

sanjay raut
sanjay rautesakal

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल होताच शहर परिसरात त्‍याचे पडसाद उमटले. वेगवेगळ्या घटनांमध्ये भाजप व शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्‍याचे बघायला मिळाले. या प्रकरणी भाजप व शिवसेनेतर्फे (bjp and shivsena) परस्‍परविरोधात तीन, तर पोलिसांमार्फत एक असे एकूण चार गुन्‍हे दाखल झाले. भाजप कार्यालयाच्‍या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी (nashik police) दहा संशयितांना ताब्‍यात घेतले होते. नाशिकमध्ये ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या कार्यकर्त्यांचा शोध सध्या नाशिक पोलीस घेत आहेत. परंतु आज (ता.२७) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निवासस्थानी घेऊन या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली असल्याचे समजते. यावेळी संजय राऊत काय म्हणाले...

हे कार्यकर्ते सध्या नाशिक मधून फरार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधान नंतर महाराष्ट्रभर सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. भाजप कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी नाशिकमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते. या कार्यकर्त्यांचा शोध सध्या नाशिक पोलीस घेत आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतल्याचे समजत असून या कार्यकर्त्यांच्या अटकपूर्व जामीनासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. हे कार्यकर्ते सध्या नाशिक मधून फरार आहेत.

sanjay raut
जनआशीर्वाद यात्रेत भाजपच्याच कार्यकर्त्यांचा राडा!

शिवसेना पदाधिकाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्‍हा दाखल

आंदोलनादरम्‍यान नारायण राणे यांच्‍या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या प्रकरणी हवालदार ललित केदारे यांच्‍या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार शालिमार येथील शिवसेना भवनात दुपारी साडेबाराच्‍या सुमारास संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, विजय करंजकर, सुधाकर बडगुजर, बबन घोलप, दत्ता गायकवाड, वसंत गिते, विलास शिंदे, सचिन मराठे, श्‍यामला दीक्षित, शोभा मगर यांच्‍यासह चाळीस-पन्नास जणांनी मंत्री राणेंच्‍या पुतळ्यास चपला मारत पुतळादहन केले. पोलिसांना पूर्वकल्‍पना न देता, तसेच जमावबंदी आदेशाचे उल्‍लंघन केल्‍याने विविध कलमांतर्गत या पदाधिकाऱ्यांवर गुन्‍हा दाखल केला.

sanjay raut
....अन्यथा केंद्राविरुद्ध आंदोलन; सदाभाऊ खोत कडाडले

मंगळवारी (ता. २४) सकाळपासूनच शहर व परिसरात तणावपूर्ण वातावरण बघायला मिळाले. शिवसेनेच्‍या जमावाने सकाळीच भाजप कार्यालयावर दगडफेक केली. तसेच, मंत्री राणे यांच्‍या प्रतीकात्‍मक पुतळ्याचे दहन केले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शिवसेनेचे कार्यकर्ते दीपक दातीर, बाळा दराडे यांच्यासह अन्‍य पाच-सहा जणांनी एन. डी. पटेल मार्गावरील वसंतस्मृती या भाजप कार्यालयावर दगडफेक केली. त्‍यात कार्यकर्त्यांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे. या प्रकरणी विजय बापूराव कुलकर्णी यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, तर चारुदत्त रामराव आहेर (रा. सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार शिवसेनेचे महेंद्र भिकाजी बडवे, वैभव अशोक खैरे, दिगंबर तुकाराम मोगरे, हेमंत गोविंदराव उन्हाळे, दस्तगीर अल्लारखा रंगरेज, मुकुंद मधुकर सपकाळ, संजय नारायण चिंचोले, गोकुळ एकनाथ तिडके, मोहित सुरेश गोसावी, सुनील बाबूराव गोडसे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्‍यान, तोडफोडीच्या घटनेतील दहा संशयितांना पोलिसांनी शिताफितीने ताब्‍यात घेतले होते. तणाव टाळण्यासाठी संशयितांना नाशिक रोड पोलिस ठाण्यात ठेवले होते. दुसरीकडे शिवसेनेच्या स्वीकृत नगरसेविका ॲड. श्‍यामला दीक्षित यांनी फिर्याद दिली. त्‍यानुसार भाजपचे मुकेश शहाणे, अनिकेत सोनवणे, अमित घुगे, अमोल इधे, पवन कलाल, किरण गाडे यांच्यासह सुमारे शंभर जणांनी शिवसेना कार्यालयाच्या दिशेने दगडफेक करीत गोंधळ घालत धमकावल्‍याचे फिर्यादीत म्‍हटले होते.

sanjay raut
टोमॅटोपाठाेपाठ कारलेही आता उकिरड्यावर; शेतकरी मेटाकुटीस

आंदोलनामुळे पसरली दहशत

भाजप-शिवसेना यांच्‍यातील वादामुळे परिसरात दहशत पसरली होती. दोन्‍ही पक्ष कार्यकर्त्यांनी कुदळ, फावडे, लाठ्या, दगड, सोडा बॉटलचा वापर केल्‍याचे आढळले. या जमावामुळे वाहतूक कोंडीची समस्‍यादेखील निर्माण झाली होती. दोन्‍ही पक्षांच्‍या कार्यालयांत पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्यात आल्‍याने या कार्यालयांना छावनीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com