baby with mother.jpg 
नाशिक

निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड

योगेश मोरे

म्हसरूळ(जि.नाशिक) : जन्म देणारी जननीच आपल्या पोटच्या गोळ्याची वैरिण कशी असू शकते हा प्रश्न अनेकांच्या मनात संताप आणत आहे. केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी ज्या लेकराला आपल्या उदरात नऊ महिने वाढवून कळा सोसून जन्म दिला. त्याचाच कर्दनकाळ ही माता बनली आहे. आडगाव परिसरात हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट

गेल्या २१ डिसेंबरला घराबाहेर खेळताना पडल्याने जखमी झालेल्या नांदूर नाका येथील सातवर्षीय मुलास त्याच्या आईने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले होते. त्यानुसार आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र पोलिसांच्या चौकशीत हा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. संशयित सोमनाथ ऊर्फ योगेश वसंत कुऱ्हाडे (वय २२, रा. साईनगर, नांदूरगाव) याचे एका २४ वर्षीय महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. तिला पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचा सांभाळ करावा लागेल व तो अनैतिक संबंधात अडसर निर्माण होत असल्याने सोमनाथ हा त्या मुलास नेहमी कमरेच्या बेल्टने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असे. २१ डिसेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने या मुलास राहत्या घराच्या भिंतीवर डोके जोरात आपटले. दुसऱ्या दिवशी (ता. २२) सकाळी मुलाच्या आईने त्याला जखमी अवस्थेत चुकीचे नाव सांगून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

चौकशी केली असता, खरा प्रकार समोर आला.

त्या वेळी तिने सर्व प्रकार माहीत असतानाही वैद्यकीय अधिकाऱ्यांना खोटी माहिती दिली होती. विशेष म्हणजे पोटचा मुलगा मृत झाल्यानंतरही मृतदेह ताब्यात न घेता ती पळून गेली. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, खरा प्रकार समोर आला. या प्रकरणी आडगाव पोलिसांत दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख तपास करीत आहेत.  

बालकाचा खून करून फरारी प्रियकर-प्रेयसीला अटक 

अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या सातवर्षीय बालकाची हत्या करून फरारी झालेला नराधम प्रियकर व त्यास मदत करणाऱ्या निर्दयी मातेस आडगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. आडगाव परिसरात हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT