गॅस गिझर भडक्यात बाथरूममध्ये तरुणाचा गुदमरून मृत्यू; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाटील कुटुंबात आक्रोश

gas gyser blast boy.jpg
gas gyser blast boy.jpg
Updated on

सिडको (नाशिक) : एकीकडे नववर्षाचे स्वागत करत असतानाच वर्षाचा पहिल्याच दिवशी पाटील कुटुंबियात मात्र ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहायला मिळाला. १ जानेवारीलाच दुपारी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ​

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ

दौलतनगरमधील गौरव समाधान पाटील (वय २७) राधावृंदावन अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये शुक्रवारी (ता. १) दुपारी चारच्या सुमारास बाथरूममध्ये होता. बाथरूममधील गॅस गिझर अचानकपणे फुटले. त्यामुळे गौरवला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. हा प्रकार त्याच्या भावाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी गौरवला मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. पोलिस उपनिरीक्षक एच. व्ही. शेळके तपास करीत आहेत.

आकस्मिक मृत्यूची नोंद

​दौलतनगरमधील एका घरात बाथरूममधील गॅस गिझर फुटल्याने बाथरूममध्ये असलेल्या तरुणाचा गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
हेही वाचा - सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com