Hemant Godse Latest Marathi News esakal
नाशिक

इगतपुरी- कसारा रेल्वे बोगदा आराखड्यासाठी 9 कोटी : MP Hemant Godse

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इगतपुरी -कसारा या दरम्यानच्या घाट क्षेत्रात सर्वच रेल्वेगाड्या कमी वेगाने धावतात तसेच सिग्नल मिळत नसल्याने रेल्वेगाडयाला सक्तीचा थांबा घ्यावाच लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी कसारा ते इगतपुरी या दरम्यान चौथी आणि पाचवी रेल्वेलाइन टाकण्याच्या कामाचा डीपीआर तयार करणेकामी रेल्वे मंत्रालयाच्या वित्त संचालनालयाने आठ कोटी सत्तर लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.

केंद्राने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे कसारा ते इगतपुरी या दरम्यान दोन नवीन रेल्वेलाइन आणि बोगद्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवालासाठी (डीपीआर) आता लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. (MP Hemant Godse Statement on Igatpuri Kasara Railway Tunnel Scheme Nashik Latest Marathi News)

मध्य रेल्वेच्या मार्गावरील कसारा -इगतपुरी दरम्यानचा लोहमार्ग घाटात तीन रेल्वेलाइन असल्याने सर्वच रेल्वेगाड्याना बँकर लावण्याची गरज पडते. आधीच घाट परिसर त्यात बँकर लावण्यासाठी जाणारा वेळ यामुळे मुंबईहून मध्यरेल्वेमार्गे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या उशिराने धावतात.

कसारा -इगतपुरी या घाट परिसरात अत्याधुनिक यंत्र सामग्रीच्या साह्याने नवीन बोगदा आणि चौथी आणि पाचवी नवीन रेल्वेलाइन टाकावी, अशी मागणी करीत खासदार गोडसे यांचा केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे.

३२ किलोमीटरचा मार्ग

कसारा ते इगतपुरी या दरम्यान टाकण्यात येणारी चौथी आणि पाचवी नवीन रेल्वेलाइन सुमारे ३२ किलोमीटरची असणार आहे. यापूर्वी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झालेले असून आता लवकरच डीपीआरचे काम सुरू होणार आहे. नवीन टनल आणि ३२ किलोमीटर लांबीचा नवीन दोन रेल्वेलाईन तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वित्त संचालनालयाने नुकतेच आठ कोटी सत्तर लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

यामुळे आता डीपीआर तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रस्तावात कसारा ते इगतपुरी दरम्यान नवीन बोगदा आणि दोन रेल्वे लाइन प्रस्तावित असल्याने भविष्यात मुंबईहून देशभरात मध्यरेल्वे मार्गाहून धावणाऱ्या सुमारे शंभर रेल्वेगाड्या विना अडथळा धावणार असून यामुळे नाशिक -कल्याण लोकल धावण्याचा मार्ग हा मोकळा होणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT