Biofloc Fish Farming Project : मत्स्यपालनातून तरुणांना लाखोंचे उत्पादन

Harshal Adhagale and Pradeep Adhagale with the Biofloc project
Harshal Adhagale and Pradeep Adhagale with the Biofloc projectesakal

देवगाव (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील दोन तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता ‘बायोफ्लॉक फिश फार्मिंग प्रकल्प' उभारत मत्स्यपालनामधून लाखोंचे उत्पादन घेत तरुणांना पैसे कमाविण्याचा मार्ग दाखवून दिला आहे. देवगाव (ता. निफाड) येथील २५ वर्षीय तरुण हर्षल आढागळे व प्रदीप आढागळे यांनी आपल्या शेतात एक अनोखा प्रयोग केला आहे. (Biofloc Fish Farming Project Production of Lakhs to Youth through Fish Farming Nashik Latest Marathi News)

‘बायोफ्लॉक फिश फार्मिंग'असे या प्रकल्पाचे नाव असून निफाड तालुक्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. या तरुणांनी २०२१ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात केली होती, त्यात फक्त ६ गुंठ्यात त्यांनी ५० हजार लीटर क्षमता असलेल्या चार टाक्या बसविल्या आहेत. त्यात ‘मऱ्हळ’ प्रकारचे मत्स्य बीज टाकले जाते. एका टाकीमध्ये ५ हजार बीज सामावू शकतात. प्रोबायोटीक बॅकटेरिया व १५ किलो गुळाचे मिश्रण तयार करून प्रत्येक टाकीमध्ये सोडले जाते. या बीजातून तयार झालेल्या तिलापिया माशाला खाद्य म्हणून उपयोगास येतात.

खाल्ल्यानंतर माशांनी निर्माण केलेल्या विष्ठेवरचं हे जिवाणू आपली संख्या वाढवितात. म्हणजेच एकदा वापरल्यानंतर हे culture पुन्हा पुन्हा वापरण्याची गरजही भासत नाही आणि खर्चही कमी होतो. या प्रकल्पामधून या तरुणांनी केवळ सहा-आठ महिन्यांत फक्त दहा लाखाची गुंतवणूक करत तेरा लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. शेतीला जोडधंदा म्हणून हा 'बायोफ्लॉक फिश फार्मिंग प्रकल्प' नक्कीच फायदेशीर ठरू शकतो, हे या तरुणांनी पटवून दिलेले आहे.

Harshal Adhagale and Pradeep Adhagale with the Biofloc project
Inspirational Story : माया टेलर ते शोरूमची मालकीण ‘मायाताई तिवर’

काय आहे हा प्रकल्प?

बायोफ्लॉक ही संकल्पना मुळात इस्राईलची असून या तरुणाने हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये करून दाखवला आहे. या तंत्रज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारच्या रासायनिक घटकांचा वापर न करता मत्स्यपालन केले जाते.

"बायोफ्लॉक प्रकल्प बनवण्यासाठीचा खर्च, मत्स्यबीज, खाद्याचा खर्च, वीजबिल, कामगारांचा खर्च, इतर वस्तूचा खर्च जाता १२ ते १४ लाखांपर्यंत नफा मिळतो."

- हर्षल आढागळे व प्रदीप आढागळे, देवगाव.

Harshal Adhagale and Pradeep Adhagale with the Biofloc project
Custard Apple News : मालेगावच्या बाजारात सिताफळ दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com