Police officers and staff while returning the missing bag of Adv. Santosh Kumar Bhalerao. esakal
नाशिक

Nashik : मुंबईच्या वकिलाची हरवलेली बॅग पोलिसांच्या तप्तरतेने परत

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाचे वकील संतोषकुमार भालेराव यांची बॅग द्वारका ते ट्रॅक्टर हाउस भागात गहाळ झाली होती. सतर्क नागरिक आणि भद्रकाली पोलिसांच्या तप्तरतेने कन्नमवार पुलाखाली ही बॅग मिळून आली. बॅग मिळाल्याने श्री. भालेराव यांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. (Mumbai lawyer lost bag returned by police promptness Nashik Latest Marathi News)

कन्नमवार पुलाखाली बॅग बेवारस अवस्थेत पडून होती. एका सतर्क नागरिकांच्या हे लक्षात आले, त्याने भद्रकाली पोलिसांना माहिती दिली. गस्तीवर असलेले बीट मार्शल दयानंद सोनवणे, विकी रुमणे यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. बॅगेची तपासणी केली असता त्यात काही कागदपत्रे मिळून आली. त्यावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला. मुंबई उच्च न्यायालयाचे वकील संतोषकुमार भालेराव यांची ती बॅग असल्याचे समजले.

द्वारका ते ट्रॅक्टर हाउस भागात बॅग गहाळ झाल्याची माहिती श्री. भालेराव यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून बॅग त्यांचीच असल्याची खात्री केली. त्यानंतर उपनिरीक्षक श्री. गवळी यांच्या हस्ते बॅग भालेराव यांना देण्यात आली. बॅगेत महत्त्वाच्या वस्तू होत्या, त्या मिळून आल्याने त्यांचा आनंद झाला. त्यांनी भद्रकाली पोलिसांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

SCROLL FOR NEXT