nmc esakal
नाशिक

‘माझी वसुंधरा’ अभियान : नाशिक महापालिकेची सर्वोत्तम कामगिरी!

महेंद्र महाजन

नाशिक : राज्य सरकारच्या पर्यावरण संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविताना स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्पर्धा घेण्यात आली. अमृत शहरांच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये नाशिक महापालिकेचा (nashik-muncipal-corporation) समावेश आहे. याशिवाय नाशिक जिल्हा परिषद आणि पिंपळगाव ग्रामपंचायतीला हा सन्मान मिळाला. शनिवारी (ता. ५) दुपारी साडेबाराला ऑनलाइन सन्मान सोहळा होईल. (My-Earth-Campaign-Best-Performance-of-Nashik-Municipal-Corporation-marathi-news)

नाशिक महापालिका, जिल्हा परिषदेसह पिंपळगाव ग्रामपंचायतीचा आज सन्मान

अभियानाची घोषणा राज्य सरकारने २०२०-२१ मध्ये केली होती. भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित पर्यावरणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. अमृत शहरांच्या गटांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांसाठी स्वतंत्र रॅकिंग ठेवण्यात आले आहे. रॅकिंगची घोषणा शनिवारी होईल. मात्र गुणवत्ता राखणाऱ्या शहरांची यादी घोषित करण्यात आली. त्यात नाशिक महापालिकेचा समावेश असल्याची माहिती अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन सन्मान सोहळा होईल. आयुक्त कैलास जाधव, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आदी पदाधिकारी ऑनलाइन सोहळ्याला उपस्थित राहतील. @majhivasundhara या फेसबुक पेजवर कार्यक्रम पाहता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

NDA Success Story: जिद्द, चिकाटी अन् कठोर प्रशिक्षणाचा विजय; पदकविजेत्या छात्रांनी उलगडला तीन वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT