आदिवासी भागात शंभर टक्के लसीकरणाचे आव्हान

vaccination
vaccinationFile photo
Summary

संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने दिंडोरी तालुक्यातदेखील मोठा प्रभाव दाखविला आहे. पहिल्या लाटेपासून दूर राहिलेला तालुक्याचा पश्‍चिम आदिवासी बहुल भागदेखील प्रभावित झाला.

मोहाडी (जि. नाशिक) : संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने दिंडोरी तालुक्यातदेखील मोठा प्रभाव दाखविला आहे. पहिल्या लाटेपासून दूर राहिलेला तालुक्याचा पश्‍चिम आदिवासी बहुल भागदेखील प्रभावित झाला. आरोग्य विभागाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले. आदिवासी भागातदेखील संसर्ग झाल्याने अनेक आदिवासीबांधव बाधित झाले होते. त्यामुळे आदिवासी भागात शंभर टक्के लसीकरण (Corona Vaccination) करण्याचे आरोग्य विभागासमोर आव्हान आहे. (news about Corona vaccination by the health department in tribal areas)

तालुक्यात कोविड केअर सेंटरची अपुरी संख्या व अत्यल्प सुविधा बघता अनेक नागरिकांना उपचारासाठी नाशिक येथील सामान्य रुग्णालयात जावे लागले. प्रशासनाने मोठ्या अडचणीनंतर वणी ट्रॉमाकेअर सेंटर येथे कोविड रुग्णालय सुरू केले. त्याठिकाणी देखील ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. बोपेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनची सुविधा नसल्याने आरोग्य विभागाला अडचणींचा सामना करावा लागला. तालुक्यात मोठ्या संख्येने रुग्ण एकाचवेळी बाधित झाल्याने अनेकांना उपचारासाठी गृहविलगीकरणातच राहावे लागले. त्यामुळे कुटुंबातील अनेक व्यक्ती बाधित होण्याचा प्रसंगदेखील अनेक ठिकाणी आले. संपूर्ण तालुक्यात शंभरच्या वर रुग्णांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूला सामोरे जावे लागले. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये आदिवासी भागात कोरोनाबद्दल अनेक गैरसमज, तसेच अंधश्रद्धा आहे. अनेक रुग्णांमध्ये लक्षणे असूनही उपचारासाठी पुढे येत नसल्याने मृत्यूचा आकडा वाढत गेला. तालुक्यात लसीकरण सुरू झाल्यापासून ग्रामीण आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आदिवासी नागरिक पुढे येत नसल्याने कोरोनामुक्त दिंडोरी तालुका करण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाची तारेवरची कसरत झाली.

vaccination
लासलगाव बाजार समितीत साधना, वेफकोला कांदा खरेदीसाठी परवानगी

दिंडोरी तालुक्यात दहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून, त्यापैकी मोहाडी, तळेगाव, वरखेडा, उमराळे, कोचरगाव, पांडाणे, निगडोळ, वणी, वारे, ननाशी येथे लसीकरण सोबतच सुरू झाले. परंतु तालुक्यातील मोहाडी, तळेगाव, खेडगाव, पांडाणे या आरोग्य केंद्रातच लसीकरण मोठ्या संख्येने झाले. इतर सहा आदिवासी बहुल आरोग्य केंद्रात अत्यंत कमी प्रमाणात लसीकरण झाल्याने आरोग्य विभागाकडे शंभर टक्के लसीकरण करण्याच्या उद्दिष्टाला ब्रेक लागला. आरोग्य विभागातर्फे जनजागृती करण्यात आली. दिंडोरीचे प्रांताधिकारी व तहसीलदारांनी देखील प्रबोधन केले. तरीदेखील आदिवासी भागातील नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाची कसोटी लागणार आहे.

vaccination
भागीदारालाच कोट्यवधींचा गंडा; रेणुका मिल्कच्या दोघा संचालकांना अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com