NAMCO Bank Election esakal
नाशिक

NAMCO Bank Election: नाशिक मर्चंट बॅंकेसाठी उद्या 324 मतदार केंद्रांवर मतदान

सकाळ वृत्तसेवा

NAMCO Bank Election : नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलसह अपक्षांचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. बॅंकेच्या १९ जागांसाठी रविवारी (ता. २४) मतदान होईल.

निवडणुकीसाठी ९९ ठिकाणी ३२४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी (ता. २५) छत्रपती संभाजी महाराज इनडोअर स्टेडिअममध्ये मतमोजणी करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी फय्याज मुलाणी यांनी दिली. (NAMCO Bank Election Voting tomorrow at 324 polling stations for Nashik news)

नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह ही मल्टिस्टेट शेड्यूल्ड बँक आहे. जिल्ह्यासह परराज्यांत बँकेचे एक लाख ८८ हजार ६३८ मतदार आहेत. रविवारी होणाऱ्या मतदानाची प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असून, अडीच हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले. या निवडणुकीसाठी रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळात मतदान होईल.

निवडणुकीसाठी ३२४ मतदान केंद्रे असून, नाशिक शहरात १५५ मतदान केंद्रांवर ९० हजार ९१६ मतदार आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात १४४ मतदान केंद्रांवर ८२ हजार ८९३ मतदार आहेत. जिल्ह्याबाहेर मुंबई, पुणे, चाकण, छत्रपती संभाजीनगर, जालना, वैजापूर, जळगाव, धुळे, दोंडाईचा, नंदुरबार, अहमदनगर, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर येथे २० मतदान केंद्रांवर १३ हजार ७८७ हजार मतदार आहेत.

राज्याबाहेर सुरत व हैदराबाद येथे प्रत्येकी एक आणि दोन मतदान केंद्रांची रचना करण्यात आली. मतदानासाठी निवडणूक आयोगाने किंवा शासनाने विहित केलेल्या पुराव्यांपैकी फोटोसहित शासकीय पुरावा ग्राह्य धरण्यात येईल.

रविवारी मतदान झाल्यावर सोमवारी सकाळी आठला श्री छत्रपती संभाजी महाराज स्टेडियममध्ये मतमोजणीस सुरवात होईल. एकूण १०८ टेबलांवर मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल. मतदान व मतमोजणीसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT