RBI Fined NAMCO Bank Latest Marathi News esakal
नाशिक

NAMCO बँकेला रिझर्व्ह बँकेकडून 50 लाखाचा दंड

सतीश निकुंभ

सातपूर (जि. नाशिक) : दि नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह (NAMCO) बँकेला रिझर्व्ह बँकेने (RBI) ५० लाख रुपयांचा दंड केला आहे. प्रशासनाच्या कार्यकाळातील चुकी असून याबाबत संचालक मंडळाने प्रयत्न केले आहेत. तरीही रिझर्व्ह बँकेने दंड (Fine) केल्याचे स्पष्टीकरण बँकेतर्फे देण्यात आले आहे. (NAMCO Bank fined Rs 50 lakh by RBI Nashik latest marathi news)

नामको बँकने निर्देशांचे पालन केले नसल्याचे रिझर्व्ह बँकेने दंडाच्या कारणांमध्ये स्पष्ट केले आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे कोणत्याही पतसंस्थांचे खाते हे राष्ट्रीयकृत बँकेत असायला हवे. जिल्ह्यातील अनेक पतसंस्थांनी २०१५ ते २०१९ मध्ये नामको बँकेत खाते उघडले. त्यावर रिझर्व्ह बँकेने आक्षेप घेत नामको बँकेला ३७ लाखांचा दंड केला.

तसेच बँकेत करंट खाते असलेल्यांचे निधन झाल्यावर अशा खातेदारांना बँकेने सेव्हींग्जप्रमाणे व्याज द्यायला हवे होते. मात्र तसे झाले नसल्याने १३ लाखांचा दंड रिझर्व्ह बँकेने केला. प्रशासकीय राजवटीतून सुटका झाल्यावर बँकेचे अशा पद्धतीने नुकसान होणे अयोग्य असल्याने त्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी ॲड श्रीधर व्यवहारे यांनी केली.

"नामको बँकेला रिझर्व्ह बँकेने केलेल्या दंडामध्ये संचालक मंडळाची कोणतीही चूक नाही. हे प्रकरण २०१५ ते २०१९ या प्रशासनाच्या काळातील आहेत. त्याबाबत संचालक मंडळाने दुरुस्ती करून पूर्तता केली होती. तरीही रिझर्व्ह बँकने दंड केला आहे."

- हेमंत धात्रक, अध्यक्ष, नामको बँक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT