
Nashik : महापालिका आयुक्तांकडून पूरस्थितीची पाहणी
जुने नाशिक : महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांनी सोमवारी (ता. ११) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सराफ बाजार परिसराची पाहणी केली. सरस्वती नाला प्रवाहाची पाहणी करत त्यांनी माहिती घेतली व काही व्यवसायिकांची चर्चा केली. (NMC Commissioner Ramesh Pawar inspects flood situation Nashik monsoon Latest)
पावसाळ्यात दहिपूल आणि सराफ बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचून परिसरास नदीचे स्वरूप येते. येथील सरस्वती नाल्याची स्वच्छता होत नसल्याने पाणी तुंबते. त्यामुळे परिसरामध्ये पाणी साचत असल्याच्या तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्या होत्या. शिवाय नदीला पूर आला आहे. यामुळे महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी अधिकाऱ्यांसह सराफ बाजाराची पाहणी केली.
परिसरातील काही व्यावसायिकांशी चर्चा केली. व्यावसायिकांनी त्यांच्या काही तक्रारी सूचना आयुक्तांसमोर मांडल्या. अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी याबाबत सूचना केल्या. दरम्यान, गोदावरी नदीपात्रालगत बालाजी कोटच्या खालून येणाऱ्या सरस्वती नाल्याचा मुख्य प्रवाहाची पाहणी केली. नाल्याचा प्रवाह व्यवस्थित असूनही, सराफ बाजारात पाणी साचण्याचे कारण काय याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
हेही वाचा: पावसामुळे बाजार समितीत 15 % पालेभाज्या आवक; संततधारेने शेतकऱ्यांना झटका
त्याचप्रमाणे सराफ बाजारातून पूरस्थितीचा आढावा घेतला. या वेळी पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, नदीपात्रातील पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने सराफ बाजारात पुराचे पाणी शिरण्याची भीती व्यवसायिकांकडून व्यक्त करण्यात आली.
त्यामुळे नदीकाठावरील विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी त्यांचे दुकाने खाली करून दुकाने सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या. त्याचप्रमाणे सराफ बाजारातील भांडे व्यावसायिक आणि सराफ व्यावसायिकांनीदेखील त्यांच्या दुकानातील माल सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दुकानातील माल हलविण्याचे काम सुरू होते.
हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील पाऊस : सप्तशृंगी गडावर ढगफुटी, पेठला एकजण बुडाला
Web Title: Nmc Commissioner Ramesh Pawar Inspects Flood Situation Nashik Monsoon Latest News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..