Nana Patole Nana Patole
नाशिक

नाना पटोले यांचा नंदूरबारसह नाशिकचा दौरा रद्द

महेंद्र महाजन

नाशिक : काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसह कोरोना संसर्गातील मदतीच्या पाहणीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बुधवारपासून (ता. २३) उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेत. धुळ्यातील बैठकी आटोपून पटोले दिल्लीकडे निघाले आहेत. त्यामुळे नंदूरबारसह नाशिकचा त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. पटोले यांचा दौरा रद्द झाल्याने नाशिक शहर आणि जिल्ह्यातील बैठकी, मेळावा होणार नसल्याची माहिती शहराध्यक्ष शरद आहेर यांनी दिली.

पुढील महिन्यात मुंबईला दोन दिवस विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसच्या हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळी पटोले यांना दिल्लीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे पटोले धुळ्याच्या बैठकी आटोपून रात्री मुंबईत पोचताहेत आणि तेथून ते विमानाने दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती काँग्रेसतर्फे देण्यात आली. काँग्रेसतर्फे विधानसभा अध्यक्षपदासाठी नाव निश्‍चित करत असताना विद्यमान मंत्र्यांमधून अध्यक्षपदासाठी नाव निश्‍चित झाल्यास संबंधित खात्याच्या मंत्रिपदासाठी पटोले यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत आहे.


प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘एकला चलो रे’ या त्यांच्या नाऱ्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये चलबिचल झाली आहे. या साऱ्या राजकीय परिस्थितीत पटोले यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशी अटकळ काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन झालेल्या फैजपूर या गावाची निवड पटोले यांनी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यात करत केंद्रीय कृषी कायद्याची प्रत जाळत केंद्राविरुद्ध वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT