नाशिकमध्ये 12 जुलैपासून होणार हवाई उड्डाण

Nashik flight
Nashik flightGoogle

नाशिक : कोरोनामुळे बंद पडलेली विमानसेवा येत्या 12 जुलैपासून सुरू होणार असून, त्यासाठी बुकिंग सुरू आहे. एअर अलायन्सतर्फे दिल्ली, अहमदाबाद, पुणे व बेळगाव या सेवा पूर्ववत सुरू होणार आहेत. (Airlines flights from nashik will resume from July 12)


स्टार एअरवेज कंपनीची 2 जुलैपासून नाशिक-बेळगाव सेवा सुरू होईल. एचएएलच्या ओझर विमानतळावर टर्मिनल उभारल्यानंतर 2018 मध्ये विमानसेवेला प्रारंभ झाला. एअर डेक्कन कंपनीच्या मुंबई, पुणे हवाई प्रवासाला अनियमिततेमुळे प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत विमानसेवा सुरू झाली. मात्र, तांत्रिक कारणांमुळे सेवेत खंड पडला. त्यानंतर केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत विमानसेवेने चांगलेच उड्डाण घेतले. जानेवारी 2021 मध्ये 16 हजार, तर फेब्रुवारी 2021 मध्ये 17 हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने विमानसेवेने विकासाच्या दृष्टीने चांगले उड्डाण घेतले. अलायन्स एअर कंपनीने अहमदाबाद, हैदराबाद, पुणे, स्पाइस जेट कंपनीतर्फे दिल्ली, पुणे, बेंगळुरू, ट्रुजेट कंपनीतर्फे अहमदाबाद, तर स्टार एअरवेज कंपनीतर्फे बेळगाव हवाई सेवा सुरू होती. त्यानंतर स्पाइस जेटने कोलकता, सुरत व अन्य कंपन्यांकडून जोधपूर, जयपूर, सिंधुदुर्ग, बेंगळुरू व चेन्नई हवाई सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोनामुळे हवाई सेवेला ब्रेक लागला. अहमदाबाद सेवा सुरळीत होती. मात्र, केंद्र सरकारनेच हवाई सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा नाशिकची हवाई सेवा उड्डाणासाठी तयार होत आहे.

Nashik flight
अखेर पंचवटी एक्स्प्रेस होणार सुरू! नाशिक-मुंबई प्रवास सोयीचा


दिल्ली, अहमदाबाद हवाई सेवा

12 जुलैपासून दिल्ली-अहमदाबाद-नाशिक, नाशिक-अहमदाबाद-दिल्ली, नाशिक-पुणे-बेळगाव व बेळगाव-पुणे-नाशिक हवाई सेवा सुरू होणार आहे. सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस हवाई सेवा राहील, अशी माहिती नाशिकच्या एव्हिएशन कमिटीचे चेअरमन मनीष रावल यांनी दिली. सध्या नाशिक-अहमदाबाद ट्रुजेट विमान कंपनीची सेवा सुरू होईल.

(Airlines flights from nashik will resume from July 12)

Nashik flight
PHOTOS : नाशिकमध्ये वटपौर्णिमा उत्साहात साजरी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com