Accident esakal
नाशिक

Nashik Accident News : शहरात वेगवेगळ्या अपघातांमध्ये 2 ठार

Latest Accident News : शहरातील वेगवेगळ्या परिसरात अपघाताच्या घटना घडल्या असून, लोखंडे मळा परिसरामध्ये कंटेनरच्या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू झाला तर एक जखमी आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील वेगवेगळ्या परिसरात अपघाताच्या घटना घडल्या असून, लोखंडे मळा परिसरामध्ये कंटेनरच्या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू झाला तर एक जखमी आहे. तर नाणेगाव दुचाकींच्या समोरासमोर अपघातात एक ठार, तर दोघे जखमी झाले. याप्रकरणी पंचवटी, देवळाली कॅम्प पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. ()

पोलीसांच्या माहितीनुसार, तारवालानगर ते हिरावाडी रोडवरील लोखंडे मळा येथे रविवारी (ता.२२) रात्री भरधाव कंटेनर (एनएल ०१ एएफ २५९८) चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने पुढे जाणाºया पिकअप (एमएच १७ बीवाय ७१८३) व कारला (एमएच १५ ईएक्स ११६२) पाठीमागून धडक दिली. त्याचवेळी समोरून येणाºया दुचाकीला (एमएच १५ एफएस २३) धक्का लागल्याने अपघातची विचित्र घटना घडली. यात दुचाकीवर डबलसिट प्रवास करणार्या मायलेकांपैकी प्रेमलताबाई पृथ्वीराज बेदमुथा (६९ रा. दत्तदर्शन रो हाऊस, लामखेडे मळा) यांच्या अंगावरून पिकअपचे चाक गेल्याने त्या गंभीररित्या जखमी झाल्या.

तर मुलगा पंकज बेदमुथा ही गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीसात अंमलदार दीपक शिलावट यांच्या फिर्यादीनुसार, कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करीत आहेत. तर, नाणेगाव शिवारात झालेल्या अपघातात नामदेव छबू सोनवणे या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

दत्तू चिमाजी भागवत (५६, रा. करंजकर गल्ली, भगूर ) यांच्या फिर्यादीनुसार, मृत सोनवणे व भागवत हे दोघे मित्र शुक्रवारी (ता.२०) सायंकाळी दुचाकीने (एमएच १५ जीवाय ४५११) सोनवणे यांच्या शेतात गुरांना वैरण टाकण्यासाठी जात होते. जय महाराष्ट्र हॉटेलसमोर भरधाव वेगातील दुचाकीने (एमएच १५ जीझेड ७७३३) धडक दिली. या अपघातात सोनवणे यांचा मृत्यू झाला. तर भागवत यांच्यासह शिवनाथ पाटोळे व अंकित रोकडे जखमी झाले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीसात शिवनाथ मुरलीधार पाटोळे (२५ रा. नाणेगाव ता.जि.नाशिक) या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT