hemant godse esakal
नाशिक

Nashik News : शिष्टाचार डावलून गोंडसेंच्या उमेदवारीचे वक्तव्य : आहेर

Nashik : शिवसेनेचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्याचे नकारात्मक पडसाद उमटत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शिवसेनेचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्याचे नकारात्मक पडसाद उमटत आहेत. श्री. गोडसे यांची उमेदवारी जाहीर करताना महायुतीचा शिष्टाचार पाळण्यात आलेला नाही, जाहीर झालेली उमेदवारी शिष्टाचाराला धरून नसल्याचे भाजपचे नाशिक लोकसभा निवडणूकप्रमुख केदा आहेर यांनी सांगितले. (Nashik aaher statement of Godse candidacy statement by ignoring etiquette marathi news)

त्यामुळे खासदार गोडसे यांच्या उमेदवारीसंदर्भात अद्यापही अनिश्चितता असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा मंगळवारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात झाला, त्या वेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीबद्दल भाष्य केले. गोडसेंना तिसऱ्यांदा नाशिकचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेत पाठविण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

त्याचबरोबर गोडसे यांनाच नाशिक लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र खासदार शिंदे नाशिकची वेस ओलांडत नाही तोच नाराजीचे फटाके फुटण्यास सुरवात झाली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने पक्षाच्या श्रेष्ठींकडे ही बाब पोचविली. नाशिकला आज लोकसभा मतदारसंघाचे निवडणूकप्रमुख व भाजपचे माजी जिल्हाप्रमुख केदा आहेर यांनी भूमिका स्पष्ट केली. महायुतीत जागानिश्चिती व उमेदवारी संदर्भात शिष्टाचार निश्चित झाला आहे.

त्यामुळे खासदार शिंदे यांनी गोडसे यांची एकतर्फी उमेदवारी घोषित केल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केली. भाजप कार्यालयातदेखील आम्ही उमेदवार जाहीर करू शकतो़ परंतु याला अर्थ नाही. प्रथम जागानिश्चिती होईल, त्यानंतर उमेदवारांची निश्चिती होईल. (latest marathi news)

महायुतीतर्फे संयुक्तरीत्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असा शिष्टाचार आहे. त्यामुळे खासदार शिंदे यांनी गोडसे यांची एकतर्फी उमेदवारी जाहीर केल्याचे आहेर म्हणाले. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी घोषणा झाली असेल. परंतु अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नाही.

शांतिगिरी महाराज अपक्ष?

संत जनार्दन स्वामींचे शिष्य शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपकडून ते उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. अद्यापपर्यंत जागा कुठल्या पक्षाला सुटेल, याबाबत निश्चितता नाही, त्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेण्याचा प्रयत्न केला.

महाविकास आघाडीतून देखील उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसल्याचे सांगितल्याने शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT