Nashik News : नाशिक उपकेंद्रासाठी 13 कोटींचा निधी! पायाभूत सुविधांच्‍या उभारणीला मिळणार गती

Nashik News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नाशिक उपकेंद्रासाठी तेरा कोटींच्‍या निधीला मंजुरी मिळालेली आहे.
Funding
Fundingesakal

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नाशिक उपकेंद्रासाठी तेरा कोटींच्‍या निधीला मंजुरी मिळालेली आहे. तसेच परीक्षा विभागाचे कामकाज सुरु करण्यासाठी दोन अधिकारी नियुक्‍त केले जाणार आहेत. त्‍यामुळे केंद्राच्‍या पायाभूत सुविधांच्‍या उभारणीला गती मिळणार असून, विद्यापीठाचे कामकाज सुरळीत होण्यास मदत होणार आहे. (Nashik SPPU sub centre Construction marathi news)

पुणे विद्यापीठाच्‍या व्‍यवस्‍थापन परिषद आणि अर्थसंकल्‍प समितीने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. शिवनई (ता.दिंडोरी) येथे पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या इमारतीची उभारणी होत आहे. आता निधी उपलब्‍धतेमुळे या इमारतीत फर्निचर व इतर आवश्‍यक वस्‍तूंच्‍या खरेदीचा मार्ग सुलभ होऊ शकणार आहे.

याशिवाय भविष्यात नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी लागणाऱ्या इमारतीचे बांधकाम करणेदेखील शक्‍य होऊ शकते. नाशिक उपकेंद्रासाठी तेरा कोटी तर नगर उपकेंद्रासाठी नऊ कोटींच्‍या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भात व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य सागर वैद्य यांनी पाठपुरावा केला होता. (latest marathi news)

Funding
Sharad Pawar : शरद पवारांनी ईडीला उघडं पाडलं, थेट आकडेवारी सांगत केली पोलखोल! 

मनुष्यबळामुळे कामकाजाला गती

परीक्षा विभागाचे कामकाज सुरू करण्यासाठी दोन अधिकारी नियुक्ती केली जाणार आहे. तसेच एसपीपीयु एज्यूटेक कंपनीचेही दोन कर्मचारी नाशिक उपकेंद्रात नियुक्‍त होणार आहेत. त्‍यामुळे कामकाजाला गती प्राप्त होऊ शकेल. व सर्व प्रकारचे दाखले ऑनलाइन पद्धतीने नाशिकला मिळण्याची सोय होणार असल्‍याचे बोलले जाते आहे.

"नाशिक उपकेंद्र सक्षमामुळे जिल्ह्यातील दोन लाख विद्यार्थ्यांचा दिलासा मिळेल. दोनशे संस्था, हज़ारो प्राध्यापकांची सुविधा होईल. झारितल्या शुक्राचार्यानी कितीही अडथळे आणले, तरी उपकेंद्र कॅम्‍पस भव्‍य स्वरूपाचे, विद्यार्थी हिताचे बनविल्‍याशिवाय आम्‍ही थांबणार नाही."

- सागर वैद्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ.

Funding
NMC News : शहरालगतची गावे महापालिका हद्दीत..! लोकप्रतिनिधींचा दबाव, मात्र प्रशासनाचा नकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com