Death esakal
नाशिक

Nashik Adivasi Morcha: आंदोलनात आलेल्या एकाचा दुर्दैवी मृत्यु; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली चक्कर

Nashik News : सिटू व माकपच्या नेतृत्वाखाली कामगार व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातून आंदोलक पायी चालत दाखल झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिटू व माकपच्या नेतृत्वाखाली कामगार व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातून आंदोलक पायी चालत दाखल झाले आहेत. या आंदोलकांपैकी एका शेतकरी आंदोलकाचा (Adivasi Morcha) सोमवारी (ता. २६) सायंकाळी मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (Nashik Adivasi Morcha death of Farmer protester marathi news)

भाऊसाहेब बाबुराव गवे (६५, रा. कसबे वणी, ता. दिंडोरी) असे मयत आंदोलक शेतकर्याचे नाव आहे. सरकारवाडा पोलिसांच्या माहितीनुसार, जिल्हाभरातून आंदोलक पायी चालत सोमवारी दुपारी शहरात दाखल झाले होते. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला आहे.

गवे हे रविवारी (ता. २५) त्यांच्या राहत्या गावावरून आंदोलनासाठी पायी चालत निघाले आणि सायंकाळी सहा वाजता म्हसरुळ येथे आंदोलकांच्या मुक्कामी पोहोचले होते. त्यानंतर सोमवारी (ता. २६) सकाळी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाला. (Latest Marathi News)

सायंकाळी गवे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांसमवेत बसलेले असताना त्यांना चक्कर आली आणि बेशुद्ध झाले. त्यांचे भाऊ रावसाहेब दवे यांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू केले.

मात्र यादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गवे यांचा मृत्यु हृदयविकार वा अशक्तपणामुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्युचे कारण स्पष्ट होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अघोरी पूजेसाठी महिलाही शोधायच्या सावज; १६ संशयितांना नोटीस, चंद्रपूरमधील प्रकार, 'सकाळ'ने उघडकीस आणलं प्रकरण

Narasimha Jayanti 2026 : श्रद्धा, धैर्य आणि न्यायाचं प्रतीक असलेली नृसिंह जयंती; जाणून घ्या तारीख, कथा आणि साजरी करण्याची पद्धत

Latest Marathi News Live Update : सांगलीत आईच्या खूनप्रकरणी मुलाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

Beed News: पशुसंवर्धन योजनांची मोठी पुनर्रचना; नव्या स्वरूपात मिळणार जनावरांसाठी लाभ; जिल्ह्यातील पशुपालकांना; डीबीटीद्वारे थेट अनुदान

Marathwada News: जायकवाडी धरणावर बाष्पीभवनाचे संकट; तापमान वाढीच्या इशाऱ्याने पाण्याची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT