Nagpur Hit and Run: नागपुरात ‘हिट ॲन्ड रन’! मद्यधुंद महिलांनी दोन तरुणांना चिरडले, २४ तासांत जामीनही मंजूर

पार्टी करून घरी जात असताना मद्यधुंद महिला चालकाने दोन मोपेडस्वार युवकांना कारने चिरडल्याची घटना रामझुल्यावर शनिवारी (ता.२४) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास उघकीस आली.
Nagpur Hit and Run Case
Nagpur Hit and Run CaseEsakal

Nagpur Ramjhula Hit and Run Case: पार्टी करून घरी जात असताना मद्यधुंद महिला चालकाने दोन मोपेडस्वार युवकांना कारने चिरडल्याची घटना रामझुल्यावर शनिवारी (ता.२४) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास उघकीस आली. या अपघातात जखमी दोन युवकांचा मृत्यू झाला असून तहसील पोलिसांनी दोन्ही श्रीमंत घराण्यातील महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचे वाहनही जप्त केले आहे.

मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (वय ३४, रा. नालसाहब चौक) आणि मोहम्मद आतीफ मोहम्मद जिया (वय ३२, रा. जाफरनगर) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. माधुरी (वय ३७), रितीका (वय ३९) अशी धडक देणाऱ्या दोन्ही महिलांची नावे आहेत. रितीका कार चालवित होत्या तर बाजूला माधुरी बसल्या होत्या. दोघीही मद्यधुंद असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास रामझुल्यावरून मोहम्मद हुसैन त्याच्या मित्र मोहम्मद आतीफ मोहम्मद जिया याच्यासह मोपेडवरून (एम.एच ३७ क्यू २९४८) सदरकडून मेयो हॉस्पिटलकडे येत होते. डाव्या बाजूने जात असताना त्यांना भरधाव येणाऱ्या मद्यधुंद असलेल्या रितीका यांनी मर्सिडिजने (एम.एच.४९, ए.एस. ६१११) मागून धडक दिली. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. (Latest Marathi News)

यादरम्यान मागून त्यांचे पती दिनेश तिथे आले. दोन्ही महिला आपले वाहन सोडून दिनेश यांच्या वाहनात बसून पसार झाल्या. अपघातानंतर नागरिकांचा जमाव रामझुल्यावर गोळा झाला. त्यांनी जखमी दोन्ही युवकांना मेयो रुग्णालयात नेले असता मोहम्मद हुसैन याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

Nagpur Hit and Run Case
James Anderson Catch : 41 वर्षाच्या अँडरसनचा भन्नाट कॅच, यशस्वी बाद झाला अन् भारत आला अडचणीत

याशिवाय मोहम्मद आतीफ मोहम्मद जिया याच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी कार जप्त केली. न्यायालयाने आरोपी महिलांना जामीन मंजूर केल्याची माहिती आहे.(Latest Marathi News)

Nagpur Hit and Run Case
Budget 2024: अजित पवार उद्या अंतरिम अर्थसंकल्प मांडणार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com