NMC News esakal
नाशिक

NMC News : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शासन अधिकाऱ्यांच्या ‘एन्ट्री’च्या हालचाली!

Nashik News : सार्वजनिक बांधकाम विभागातील हे दोन अधिकारी असून या दोघांची महापालिकेत नियुक्ती झाल्यास वाद निर्माण होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेत अंतर्गत बदल्या करताना दावेदारांना डावलून कमी शिक्षण व अनुभव नसलेल्या कर्मचारी, अभियंत्यांना महत्वाची पदे देण्यावरून नाराजी असतानाच आता सिंहस्थ कुंभमेळाच्या कामाचेनिमित्त करून शासन सेवेतील दोन अधिकारी शहर अभियंता व अधिक्षक अभियंता पदावर बसविण्याच्या हालचाली सुरु असल्याने ट्रिपल इंजिन सरकारच्या कार्यकाळात विकास कामांपेक्षा प्रशासकीय कामकाजातील ढवळाढवळ अधिक चर्चेत आली आहे. (Nashik Simhastha kumbh mela officials transfer marathi news)

सन २०२७ मध्ये नाशिक नगरीत कुंभमेळा होत आहे. त्यासाठी महापालिकेकडून ११ कोटींहून अधिक किमतीचा आराखडा तयार केला आहे. सिंहस्थ कुंभमेळा पार पाडण्यासाठी नाशिक महानगरपालिका सक्षम यंत्रणा असताना कुंभमेळ्याचे निमित्त करून शासन सेवेतील दोन अधिकारी शहर अभियंता व अधीक्षक अभियंता या पदावर नियुक्त करण्याचा घाट घातला जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील हे दोन अधिकारी असून या दोघांची महापालिकेत नियुक्ती झाल्यास वाद निर्माण होणार आहे. महापालिकेत आधीच शासन व परत सेवेतील अधिकाऱ्यांमध्ये सूप्त वाद आहे. (Latest Marathi News)

आता कुंभमेळ्याचेनिमित्त साधून शासन समिती अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नियुक्त करण्याच्या हालचाली गतिमान झाल्याने नाराजीत अधिक भर पडली आहे नाशिक महापालिकेत सध्या या दोन्ही पदांवर स्थानिक अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. यातील एक अधिकारी ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर पदोन्नती देणे अपेक्षित असताना शासनसेवेतील अधिकारी आणले जात असल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT