Nashik Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : बदापूर ग्रामपंचायत सदस्य रामनाथ देवडे लाच घेताना जाळ्यात

Nashik Bribe Crime : शाळा कामाच्या तक्रारी न करण्याच्या बदल्यात ग्रामपंचायत सदस्य रामनाथ देवडे यांनी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : चिचोंडी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत असणाऱ्या बदापूर येथील शाळा कामाच्या तक्रारी न करण्याच्या बदल्यात ग्रामपंचायत सदस्य रामनाथ देवडे यांनी १५ हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारली. भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली. (Nashik Bribe Crime)

जिल्हा परिषदेच्या बदापूर शाळेला प्रधानमंत्री श्री निधीतून ७.३० लक्ष रुपये मंजूर झाले असून, या निधीतून शाळेत सुशोभीकरण व परसबागेचे काम सुरू आहे. याबाबत चिंचोडी खुर्द व बदापूर ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य रामनाथ उमाजी देवडे (वय ५२) यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात जिल्हा परिषद शाळेच्या शालेय समितीच्या अध्यक्षांकडे बुधवारी (ता. १४) २० हजार रुपयांची मागणी केली.

तडजोडी अंती १५ हजार रुपये घेण्याचे ठरले. ती रक्कम स्वीकारताना देवडे यांना पकडण्यात आले. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ चे कलम ७ प्रमाणे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नाना सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन गोसावी, अविनाश पवार यांनी ही कारवाई केली.

दरम्यान, गावोगावी ग्रामपंचायतीच्या विकासकामांतील तक्रारी पुढे येत आहेत. मात्र, पकडला तो ‘चोर’ आणि पकडला जात नाही, तो ‘साव’, असे चित्र असल्याने सर्वत्र विकास निधी आणि त्यातील गंमतीजमतीची चौकशी होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह शंभर दिवसांमध्येच आले अडचणीत; सरकारविरोधात संघर्ष पेटला

IND vs ZIM 1st T20I: मयांक यादवने इतिहास रचला, पण कौतुक इशान किशनचे झाले! पहिल्याच चेंडूवर असे काय घडले? Video Viral

Ajit Pawar Statue: बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण; तिरंगा सर्कलजवळ स्मृतीस्थळाला मान्यवरांची उपस्थिती

Latest Marathi Update : प्रियांका गांधी वाड्रा दिल्लीतील लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचल्या

Delhi Lathi Charge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मोहोळमध्ये तीव्र निषेध; विविध पक्ष, संघटना व वकील संघटनेची भव्य रॅली

SCROLL FOR NEXT