Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News : मध्यप्रदेशात चालत्या कारचे स्टेअरिंग लॉक; कानमंडाळे येथील द्राक्ष उत्पादकाचा जागीच मृत्यू

Accident News : द्राक्ष व्यापाऱ्याकडील थकीत रक्कम घेण्यासाठी मध्यप्रदेश राज्यात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या कारचे स्टेअरिंग लॉक होऊन अपघात झाला

सकाळ वृत्तसेवा

सोग्रस : द्राक्ष व्यापाऱ्याकडील थकीत रक्कम घेण्यासाठी मध्यप्रदेश राज्यात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या कारचे स्टेअरिंग लॉक होऊन झालेल्या अपघातात चांदवड तालुक्यातील कानमंडाळे येथील एका तरुण शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर पाचजण जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता.२) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत पाचजण जखमी झाले आहेत. (Nashik accident Madhya Pradesh Grape growers died marathi news)

याबाबत माहिती अशी की, चांदवड तालुक्यातील कानमंडाळे येथील शेतकऱ्यांनी द्राक्षमाल मध्यप्रदेशच्या व्यापाऱ्याला दिला होता. परंतु, विक्री केलेल्या मालाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नव्हते. थकीत रक्कम घेण्यासाठी निवृत्ती जाधव, शंकर जाधव, कृष्णा मोरे, शरद लोखंडे, सनी अहिरे, मंगेश शिंदे शनिवारी (ता.२) कारने मध्यप्रदेशकडे निघाले होते.

गुना जिल्ह्याच्या हद्दीत आल्यानंतर स्टेअरिंग लॉक झाल्याने कार दुभाजकावर आदळली. या घटनेत चालकाशेजारी बसलेल्या निवृत्ती रामनाथ जाधव (वय ४०) या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाचजण जखमी झाले. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, सोमवारी (ता. ४) दुपारी निवृत्ती जाधव यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरणात 24 तासांत 3.90 TMC पाण्याची आवक! 67 टीएमसीचा टप्पा पार, महाबळेश्वर-नवजात मुसळधार; पाहा आजची ताजी आकडेवारी

जितेंद्र यांनी विकत घेतलेला 4.25 लाखांना बंगला, आज त्याची किंमत 450 कोटी, जितेंद्र यांची मास्टरस्ट्रोक डील

Latest Marathi Update : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी जंतर-मंतरवर दाखल

Satara Loan Waiver: सातारा जिल्ह्यात ५४ हजार खाती कर्जमुक्तीकडे; बॅंकांमधील माहिती पोर्टलवर अपलोड, ५६९.४० कोटी होणार माफ

IND vs ZIM, T20I: 'Vaibhav Sooryavanshi ने चूका सुधारण्यावर लक्ष दिले असेलच, त्यामुळे...' श्रेयस अय्यरचे मोठे विधान

SCROLL FOR NEXT