MLA Saroj Ahire while inaugurating traffic control signals, smart digital poles, updated cameras at Eklahare Chauphuli in Sinner Phata area on Nashik Pune Highway,
MLA Saroj Ahire while inaugurating traffic control signals, smart digital poles, updated cameras at Eklahare Chauphuli in Sinner Phata area on Nashik Pune Highway, esakal
नाशिक

Nashik News : सिन्नर फाट्यावर वाहतूक सिग्नलसह CCTV कॅमेरे सुरु! आमदार अहिरेंच्या स्मार्ट सिटीकडील पाठपुराव्याला अखेर यश

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर फाटा परिसरात एकलहरे चौफुलीवर वाहतूक नियंत्रण सिग्नलसह स्मार्ट डिजिटल पोल, अद्ययावत कॅमेरे बसविण्यात आले असून त्याचे लोकार्पण आमदार सरोज आहिरे, स्वातंत्र सैनिक रघुनाथ खालकर यांच्या पत्नी विठाबाई खालकर यांचे हस्ते करण्यात आले. (Nashik CCTV cameras traffic signals at Sinnar Phata marathi news)(latest marathi news)

यावेळी अशोक खालकर, माजी नगरसेविका जयश्री खर्जुल, वैशाली भागवत, व्यापारी बँकेचे माजी अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष मनोहर कोरडे, वसंत अरिंगळे, शांताराम भागवत, बाजीराव भागवत, नामदेव सानप, बाळासाहेब म्हस्के, शांताराम सांगळे, चिंतामण कोरडे, साहेबराव खर्जुल, बाळासाहेब खालकर, ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर, जाखोरी सरपंच मंगला जगळे, रोहित कटाळे, अभय खालकर, आकाश लगड, गणेश रिकामे आदी उपस्थित होते.

एकलहरे चौफुलीवर नेहमीच अपघात, वाहतूक कोंडी होत असल्याने याठिकाणी अद्ययावत सिग्नल यंत्रणा बनवण्यासाठी आमदार अहिरे यांनी स्मार्ट सिटी प्रशासनाकडे एक वर्षापूर्वी केलेल्या पाठपुरावा केला होता. स्मार्ट सिटी प्रशासनाकडून सिन्नर फाटा येथील चौकात सिग्नल चौकात स्मार्ट डिजिटल पोल व अद्ययावत कॅमेरे बसविल्याने वाहतूक कोंडीसह अपघातांना आळा बसणार आहे.

सिन्नर फाटा भागातील नाशिक-पुणे महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक हैराण आहेत. या चौकात एकलहरे, कोटमगाव, या भागातून येणारी वाहने, दोन्ही बाजूने जोडलेला सर्विस रोडमुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी व अपघाताची संख्या वाढलेली आहे. (latest marathi news)

सिन्नर फाटा येथे नाशिक स्मार्ट अॅण्ड सेफ सिटी सोल्यूशन या प्रकल्पाअंतर्गत एटीसीएस सिग्नल यंत्रणा, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिक्गनेशन (एएनपीआर) कॅमेरे आणि रेड लाइट व्हायोलेशन कॅमेरे (आरएलव्हीसी) बसवावेत अशी मागणी केली होती.

गुन्हेगारी रोखण्यास होणार मदत

स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम झाले. अशा प्रकारची यंत्रणा वाहनचालकांसह, पोलिस प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदतगार होणार आहे. शहरात येणारी वाहने पोलिसांच्या नजरेत राहणार असून गुन्हेगारी रोखण्यासाठीही या आधुनिक चौकाची मदत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT