नाशिक

Nashik News : बॉईज टाऊन प्रकरणी समिती गठित; पालकांकडून रोष व्‍यक्‍त, व्‍यवस्‍थापनाने फेटाळले आरोप

Nashik News : बॉईज टाऊन पब्‍लिक स्‍कूलमधील माध्यमिक स्‍तरावरील विद्यार्थ्यांना विनाअनुदानित तत्त्‍वानुसार शैक्षणिक शुल्‍क भरण्याचा दावा करताना पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बॉईज टाऊन पब्‍लिक स्‍कूलमधील माध्यमिक स्‍तरावरील विद्यार्थ्यांना विनाअनुदानित तत्त्‍वानुसार शैक्षणिक शुल्‍क भरण्याचा दावा करताना पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. यानंतर जिल्‍हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी तीन अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठित केली असून, या समितीमार्फत सत्‍यता, अटी-शर्तींची पडताळणी होणार असल्‍याचे समजते. (Committee formed in Boys Town School case Outrage from parents)

बॉईज टाऊन पब्‍लिक स्‍कूलमधून इयत्ता चौथीमध्ये उत्तीर्ण झाल्‍यानंतर पाचवीच्‍या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना विनाअनुदानित तत्त्‍वासंदर्भातील माहिती देताना सुधारित शुल्‍क भरण्यास सांगण्यात आले. तेव्‍हापासून शालेय व्‍यवस्‍थापन विरुद्ध पालक अशी वादाची ठिणगी पडलेली आहे. दरम्‍यान नुकतीच नोटीस बजावताना येत्‍या १० जूनपर्यंत शुल्क भरण्याच्‍या सूचना देण्यात आल्‍या.

यासंदर्भात पूर्वीपासून विरोध करणाऱ्या पालकांनी आता शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षण विभागातील इतर अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. पूर्णतः अनुदानित असतानाही विनाअनुदानित करण्याचा घाट का घातला जातो आहे, असा प्रश्‍न पालकांकडून उपस्‍थित होत आहे.

दरम्‍यान पालकांच्‍या आरोपांनंतर शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी समिती गठित केली आहे. या समितीमध्ये उपशिक्षणाधिकारी उदय देवरे, गणेश फुलसुंदर, प्रकाश अहिरे यांचा समावेश आहे. सर्व बाबींची पडताळणी करून समिती शिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल सादर करेल. (latest marathi news)

मोजक्‍याच पालकांची आडकाठी

संस्थेच्या पदाधिकाऱ्याशी संपर्क साधत भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी १५८ विद्यार्थ्यांनी शुल्‍क भरले असून, केवळ २२ जणांचे शुल्‍क भरलेले नाही. मोजक्‍याच पालकांकडून आडकाठी आणली जात आहे असे सांगत व्‍यवस्‍थापनाची भूमिका पालकांसमोर यापूर्वीच मांडल्याचे सांगितले.

तसेच बहुतांश पालक संस्थेच्या भूमिकेशी सहमत आहेत. परंतु हेतुपुरस्सर काही पालक अडवणूक करत असल्याचे म्हणत पदाधिकाऱ्याने कुठल्‍याही प्रकारे शासकीय नियमांचे उल्‍लंघन केलेले नसल्याचा दावा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत 'अदृश्य हात'; देशभरातून पिझ्झा, बर्गरसह जेवणाची ऑर्डर

Jalna Congress BJP Protest: जालन्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद

Anantnag Attack: जम्मू-काश्मीर पुन्हा हादरलं! अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; पोलीस जवान शहीद, हल्ल्याची जबाबदारी कुणी स्वीकारली?

CJP Protest Delhi : आता चर्चा जंतर मंतरवरच! अन्यथा...; CJPची मोठी अट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT