Nashik Lok Sabha Vote Counting : नाशिकची 10, तर दिंडोरीची 9 तास मतमोजणी

Nashik News : नाशिकच्या मतमोजणीला दहा, तर दिंडोरीला नऊ तास लागले. नाशिक लोकसभेत तब्बल ३१ उमेदवार व दिंडोरीत दहा उमेदवार रिंगणात होते.
Nashik Lok Sabha Vote Counting
Nashik Lok Sabha Vote Counting Sakal

Nashik News : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांची एकाच ठिकाण मतमोजणी आणि त्यातही मतमोजणीचा संपूर्ण परिसर हा ‘एमआयडीसी’ने व्यापलेला असल्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. परंतु, उमेदवारांनी दाखवलेला संयम व कार्यकर्त्यांनी पाळलेल्या मर्यादेमुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. (Nashik Lok Sabha Vote Counting)

नाशिकच्या मतमोजणीला दहा, तर दिंडोरीला नऊ तास लागले. नाशिक लोकसभेत तब्बल ३१ उमेदवार व दिंडोरीत दहा उमेदवार रिंगणात होते. या दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी अंबड ‘एमआयडीसी’तील केंद्रीय वखार महामंडळाच्या गुदामात करण्यात आली. सकाळी आठला मतमोजणीस प्रारंभ झाला. पोस्टल मतमोजणी सुरू झाल्यानंतर साडेआठला कंट्रोल युनिट (ईव्हीएम) मधील मतांची मोजणी सुरू झाली.

प्रत्येक फेरीसाठी अर्धा तासाचा कालावधी पुरेसा मानला जात असताना पहिल्या काही फेऱ्यांना त्यापेक्षा अधिक कालावधी लागला. मतमोजणीसाठी नाशिकमध्ये ८५० उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दिंडोरीत २५० प्रतिनिधी उपस्थित राहिले. उमेदवार प्रतिनिधींनी केटरर्स चालकाकडे जेवणाची ऑर्डर दिलेली असतानाही त्यांना वेळेवर जेवण मिळाले नाही. अखेर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी पोलिसांचा बडेजाव झुगारून जेवणाच्या ठिकाणी प्रवेश मिळवला.

स्वतः फूड पॅकेट उचलून आणले आणि कार्यकर्त्यांना वाटले. यामुळे कार्यकर्त्यांचे जेवणाचे हाल झाले. मतमोजणी कर्मचाऱ्यांना दुपारी अडीचला जागेवर जेवण मिळाले. तोपर्यंत निकालाचा कौल लक्षात आलेला होता. कार्यकर्त्यांची गर्दी कमी झालेली होती. जेवणानंतर कर्मचाऱ्यांनी अजून झपाट्याने काम करत सायंकाळी पाचपर्यंत सगळ्या फेऱ्या संपवल्या. अंतिम फेरी जाहीर होताच कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. (latest marathi news)

Nashik Lok Sabha Vote Counting
Nashik Lok Sabha Constituency : भाजप आमदारांना ‘उद्धव’ शिलेदार भारी! सत्ता नसताना संघर्षात्मक लढा उभारण्याचा दिला संदेश

विजयी उमेदवारांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. नाशिकची मतमोजणी सलग दहा तास चालली. दिंडोरीची नऊ तास चालली. रात्री साडेबारापर्यंत अधिकारी मतमोजणी उत्तर प्रक्रिया करत होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा नाशिकचे निवडणूक निर्णय अधिकारी होते. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्यांच्या मदतीला सहा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नऊ तहसीलदार, ४८५ मतमोजणी कर्मचारी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांचे चोख नियोजन

महाविकास आघाडीने विजयात जशी आघाडी घेतली, तशीच नियोजनातही घेतल्याचे दिसून आले. प्रत्येक मतदान केंद्रावर किती टक्के मतदान झाले आहेत तेथील मशिन अर्थात बीयू, सियू व व्हीव्हीपॅट यांचा क्रमांक, किती वाजेला मशिन बंद करण्यात आले त्याची वेळ, किती वाजेला मशिन उघडले त्याची वेळ, बॅटरी किती टक्के शिल्लक आहे, त्याची नोंद आणि प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते नोंदवण्यासाठी अत्यंत सुंदर शीट प्रत्येक उमेदवार प्रतिनिधीकडे देण्यात आले होते.

त्यावर नोंद झाल्यानंतर एका व्यक्तीकडे आपली मते द्यायची आणि एका तालुक्याचे मतदान एक व्यक्ती मोजणी करत होता. सहा विधानसभा प्रतिनिधींकडे आकडा आल्यानंतर त्यांची अंतिम मोजणी करण्यासाठी दोन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक फेरीत उमेदवाराला किती मतांची आघाडी मिळाली हे अवघ्या काही मिनिटांतच सर्वांना कळायचे.

Nashik Lok Sabha Vote Counting
Nashik Lok Sabha Election : पराभवाची भाजपकडून झाडाझडती; प्रदेश कार्यालयाने मागविला अहवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com