Corona Update google
नाशिक

नाशिक जिल्ह्यात २ दिवसांत २०९ कोरोना बाधित; तिघांचा मृत्‍यू

अरुण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या शंभराहून अधिक राहात आहे. दोन दिवसांत जिल्‍ह्यात २०९ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. यापैकी १४५ कोरोनाबाधित नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. २१९ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. तिघा बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात ९८८ बाधितांवर उपचार सुरू आहेत.


ग्रामीण भागात कोरोना पुन्‍हा डोके वर काढू लागला असून, काही दिवसांच्‍या आकडेवारीतून हे स्‍पष्ट होते. रविवारी (ता. १९) जिल्‍ह्यात १०७ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. यापैकी ७४ नाशिक ग्रामीण, २७ नाशिक शहरातील, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील पाच, जिल्‍हाबाहेरील एकाचा समावेश होता. या दिवशी ८५ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. नाशिक ग्रामीणमधील एका बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यूची नोंद आहे.


सोमवारी (ता. २०) जिल्‍ह्यात १०२ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. यापैकी ७१ नाशिक ग्रामीण, तर नाशिक शहरातील २१ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली. मालेगावच्‍या आठ, तर जिल्‍हाबाहेरील दोघांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. या दिवशी दोन बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद असून, दोघे मृत नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत.


जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दोन दिवसांत एक हजार ५३२ संशयित रुग्‍ण दाखल झाले आहेत. रविवारी दाखल झालेल्‍या ७८३ संशयितांपैकी नाशिक महापालिकेतील ७६५ रुग्‍ण असून, जिल्‍हा रुग्‍णालयात एक, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात दोघे दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील दहा, तर मालेगावच्‍या पाच रुग्‍णांचा समावेश आहे. सोमवारी दाखल झालेल्या ७४९ रुग्‍णांपैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील ७३० रुग्‍ण असून, जिल्‍हा रुग्‍णालयात एक, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात दोघे रुग्‍ण दाखल झाले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये ११, तर मालेगावमधील पाच रुग्‍णांचा समावेश आहे. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ७८ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणच्‍या ५९० रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती, तर नाशिक शहरातील ३०१ व मालेगावचे १८७ अहवाल प्रलंबित होते.

मालेगावला पुन्‍हा वाढतोय प्रादुर्भाव

नाशिक शहर व ग्रामीण भागात नव्‍याने कोरोनाबाधित आढळत असताना, बहुतांश वेळा मालेगावला आढळलेल्‍या कोरोनाबाधितांचा आकडा निरंक असायचा. मात्र, गेल्‍या दोन दिवसांत येथे १३ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली आहे. मालेगावला पुन्‍हा प्रादुर्भाव वाढत असल्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Crisis: मोजतबा खामेनींना सत्तापालटाची भीती! इराणमध्ये कठोर नियम लागू; अमेरिका-इस्त्रायलवर गंभीर आरोप

IND vs AFG: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! विराट कोहली मालिकेबाहेर? 'हा' खेळाडू घेणार जागा!

संजू राठोडच्या 'गुलाबी साडी' गाण्यासाठी अभिनेत्रीला किती पैसे मिळाले? प्राजक्ता म्हणाली, 'चांगला मित्र म्हणून त्याने...'

NEET 2026 री-एग्झामचा सुद्धा पेपर झाला लीक? टेलिग्रामवरील दाव्यांची NTA कडून सायबर क्राइमकडे चौकशी

Nagpur News : पुन्हा ‘नीट’ परीक्षा देण्याची हिम्मत नाही; विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, सुसाइड नोटमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT