Fraud Crime  sakal
नाशिक

Nashik Fraud Crime : खोटे दस्तावेज, खोट्या स्वाक्षऱ्या करून शासनाची आर्थिक फसवणूक; आरोग्य सेवकावर गुन्हा दाखल

Fraud Crime : फसवणूक केल्या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे पंचायत समितीच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : तालुक्यातील नांदगावसदो आरोग्य केंद्रांतर्गत मानवेढे आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेवक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीने शासकीय खोटे दस्तावेज व खोट्या स्वाक्षऱ्या करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे पंचायत समितीच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी तुफेल शरीफ खान (रा. नाशिक) या आरोग्यसेवकाविरोधात शुक्रवार (ता. २६) गुन्हा दाखल केला आहे. (Financial fraud of government by fake documents fake signature )

अनेक वर्षांपासून तो कर्तव्यावर गैरहजर व मुख्यालयात न राहाणे, राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग न घेणे आदी कारणाने चौकशी करून जिल्हा आरोग्य कार्यालयामार्फत त्यास मूळ वेतनावर ठेवले होते. मात्र तुफेल खान याने खोटे दस्तावेज व अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षरी करीत जिल्हा आरोग्य कार्यालयाविरोधातच आयुक्त विभागाकडे अपील केले होते. या अपिली निकालात खान याला वेतन फरक मिळावा, असा आदेश जिल्हा आरोग्य विभागाला देण्यात आला. याबाबत सादर कागदपत्रांची तपासणी समितीने इगतपुरी तालुका आरोग्य विभागाकडे अहवाल पाठविला असता, तालुका वैद्यकीय विभागात असा आदेश प्राप्त नोंद न झाल्याचे आढळले.

याबाबत चौकशी केली असता, तुफेल खान याने बनावट दस्तावेज व खोट्या स्वाक्षरी वापरून शासकीय विभागाकडे आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने बनाव केल्याचे निदर्शनास आले. जिल्हा आरोग्य विभागाच्या आदेशान्वये तक्रारदार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने आरोग्यसेवक तुफेल शरीफ खान याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गणेश बुवा व पोलिस पथक करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT