Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: पेट्रोलपंपाच्या नावाखाली तब्बल 46 लाख 44 हजारांची फसवणूक! किराणा व्‍यापाऱ्याकडून सायबर पोलिस ठाण्यात तक्रार

Crime News : पेट्रोलपंप सुरु करण्यासाठी परवानगी मिळवून देण्याची बतावणी करत किराणा व्‍यापाऱ्याची भामट्यांनी तब्‍बल ४६ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पेट्रोलपंप सुरु करण्यासाठी परवानगी मिळवून देण्याची बतावणी करत किराणा व्‍यापाऱ्याची भामट्यांनी तब्‍बल ४६ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. वेगवेगळ्या बँक खात्‍यांमध्ये पैसे जमा करूनही संबंधितांकडून प्रतिसाद मिळत नसल्‍याने आपली फसवणूक झाल्‍याचे व्‍यापाऱ्याच्या लक्षात आल्याने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्‍यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. (Nashik fraud cyber crime under name of petrol pump marathi news)

सायबर पोलिस ठाण्यात किराणा व्‍यापारी असलेल्‍या संतोष चंद्रकांत कटारे (वय ४७, रा. गोसावीवाडी, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्‍हटल्‍यानुसार, वेगवेगळी नावे सांगणाऱ्या अनोळखी व्‍यक्‍तींनी ईमेल, फोन आणि व्‍हॉट्‌सॲपद्वारे इंडियन ऑइल या कंपनीचे अधिकारी असल्‍याचे भासवीत त्‍यांना संपर्क केला.

तसेच इंडियन ऑइल कंपनीचे बनावट कागदपत्रे ई-मेलद्वारे पाठवून पेट्रोलपंप मिळवून देण्याचे आमिष त्‍यांना दाखविले. वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्‍यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. त्‍यानुसार कटारे यांनी एकूण ४६ लाख ४४ हजार ६२५ रुपये बँक खात्‍यात जमा करूनही पंपाची मान्‍यता न मिळाल्‍याने फसवणूक झाल्‍याचे त्‍यांच्‍या निदर्शनात आले. (Latest Marathi News)

त्‍यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. २३ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्‍यांमध्ये ही रक्‍कम जमा केल्‍याचे फिर्यादीत म्‍हटले आहे. गेल्‍या काही कालावधीपासून भामट्यांकडून अशा प्रकारच्‍या फसवणुकी होत असून, नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिस ठाण्याकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT