Jalgaon Cyber Crime : सायबर भामट्याला गाझीयाबादहून उचलले

Jalgaon Cyber Crime : अनोळखी व्यक्तींना फोनवर आधारकार्ड, पॅनकार्ड, ई-मेल आयडी ची माहिती शेअर करु नये.
Cyber Criminal
Cyber Criminalesakal

Jalgaon Cyber Crime : विमा पॉलिसीवर बोनस व मेडिकल कव्हर मिळवून देण्याचे अमिष दाखवत तरुणाला ८ लाख ९५ हजार ६४६ रुपयांना गंडविणाऱ्या दिव्यांग संशयीतासह त्याच्या मावसभावाला गोवा येथून अटक केल्यानंतर जळगाव सायबर पोलिसांनी तिसरा संशयित सौरभ प्रमोदकुमार शर्मा (वय ३०) याला गाझीयाबाद येथून अटक करुन जळगावला आणले. (Jalgaon Crime Cyber ​​fraud was arrested Ghaziabad)

बनावट तयार केलेले बॉण्ड पेपर व इन्कम टॅक्सचे प्रमाणपत्र व्हाट्स अपद्वारे पाठवून तरुणाचा विश्वास संपादन करुन भामट्याने दाम्पत्याकडून वेळोवेळी ८ लाख ९५ हजार ६४६ रुपये घेउन फसवणूक केली होती. डिसेंबर महिन्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास सुरू होता.

एटीएम भोवले

संशयितांनी पणजी, मडगाव येथील एटीएममधून रक्कम काढल्यानंतर तेथील सीसीटीव्ही फुटेजनुसार पोलिस मागावर राहिले. गोव्यातून अवदेशकुमार रामकिशोर (वय २४) व रामप्रसाद लल्लू निशाद (वय २५, रा. उत्तर गोवा) यांना अटक करण्यात आली.

त्या दोघांकडून मोबाईल, सिमकार्ड, चेकबुक, डेबिट कार्ड व इतर साहित्य जप्त करण्यात आले. संशयित रामप्रसाद हा दिव्यांग असूनही त्याने मावसभाऊ अवदेशकुमार याच्यासह हा गुन्हा केला आहे.

Cyber Criminal
Nashik Crime News : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली उच्चशिक्षितांना गंडा; सायबर पोलिसात गुन्हा दाखल

सायबर गुन्हेगाराच्या अटकेसाठी उपनिरीक्षक दिगंबर थोरात,प्रविण वाघ, राजेश चौधरी,दिलीप चिचोले व दिपक सोनवणे अशांच्या पथकाने उत्तरप्रदेश राज्यातील गाझियाबाद गाठले.

पथकाने प्राप्त तांत्रिक माहितीचे आधारे संशयीतांचा ठावठिकाणा शोध घेवुन गुन्हयाचे तपासात संशयित आरोपी सौरभ प्रमोदकुमार शर्मा (वय-३०, गुलधार-२, गाझीयाबाद, उत्तरप्रदेश) यांस अटक करुन त्याच्या ताब्यातुन मोबाईल, सीमकार्ड असे जप्त केले.

नागरीकांना जाहीर आवाहन

अनोळखी व्यक्तींना फोनवर आधारकार्ड, पॅनकार्ड, ई-मेल आयडी ची माहिती शेअर करु नये. कोणी बँक खाते उघडुन कमीशन बेसवर वापरण्यास मागत असेल तर तत्काळ सायबर पोलीस ठाण्यात किंवा 1930 या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क करावा अथवा Cybercrime.gov.in यावर ऑनलाईन तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Cyber Criminal
Jalgaon Political News : भाजपच्या उमेदवार निश्‍चितीनंतर विरोधकांची नावे ठरणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com