crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : मातोरीच्या गुंडाला तडीपार

Nashik Crime : गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला नाशिक ग्रामीण पोलिसांनी शहर-जिल्ह्यातून ८ महिन्यांसाठी तडीपार केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला नाशिक ग्रामीण पोलिसांनी शहर-जिल्ह्यातून ८ महिन्यांसाठी तडीपार केले आहे. रोशन दिनकर लोखंडे (रा. मातोरी, ता. नाशिक) असे तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुंडाचे नाव आहे. लोखंडे याच्याविरोधात नाशिक तालुका पोलिस ठाणे आणि म्हसरुळ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, आर्मॲक्टसह गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. (Nashik Crime Matori gaon tadipar marathi news)

तसेच, त्याची मातोरी, मखमलाबाद परिसरामध्येही दहशत होती. आगामी निवडणुका व सणउत्सव पाहता उपविभागीय दंडाधिकार्यांकडे नाशिक तालुका पोलिसांकडून तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावानुसार, सराईत गुन्हेगार लोखंडे यास शहर-जिल्ह्यातून ८ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजित आमले, हवालदार एन.आर. वाघ, रवींद्र गांगोडे यांनी कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Mohan Bhagwat: ब्रिटनमधील हिंदूंची ब्रिटन हीच कर्मभूमी: मोहन भागवत; कर्मभूमीशी प्रतारणा करण्यास हिंदुत्व सांगत नाही

Baba Amte Anandwan: बाबा आमटेंचे ‘आनंद निकेतन’ हस्तांतराच्या वाटेवर, पुनर्बांधणीचा खर्च पेलवेना, आनंदवनातील कॉलेज अडचणीत

Motivational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या; रमाबाईंच्या जिद्दीची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

तुम्हाला मूल्यमापन करण्याची गरज आहे का?

SCROLL FOR NEXT