crime esakal
नाशिक

Nashik Crime News : 2 लाख 70 हजारांच्या मांससह 7 गोवंश जनावरे पोलिसांकडून जप्त

Nashik Crime : भद्रकाली गुन्हे शोध पथक यांच्या संयुक्त कारवाईत ५०० किलो गोवंश मांस आणि ७ गोवंश जनावरे असा सुमारे दोन लाख ७० हजारांचा ऐवज जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहर गुन्हे शाखा युनिट २ आणि भद्रकाली गुन्हे शोध पथक यांच्या संयुक्त कारवाईत ५०० किलो गोवंश मांस आणि ७ गोवंश जनावरे असा सुमारे दोन लाख ७० हजारांचा ऐवज जप्त केला. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवार (ता.२३) पहाटेच्या सुमारास छापा मारत कारवाई करण्यात आली. (Nashik Crime Police seized cattle with meat marathi news)

बागवानपुरा हरी मंजिल परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश मांस विक्री होत असल्याची माहिती युनिट २ पथकाचे हवालदार विशाल पाटील यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक अजय पगारे यांच्यासह सहाय्यक उपनिरीक्षक बाळू शेळके, विवेक पाठक, हवालदार प्रकाश भालेराव, शंकर काळे, विशाल पाटील तसेच भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे सतीश साळुंखे, कय्यूम सय्यद, नीलेश विखे यांनी छापा टाकला. विक्रीसाठी असलेले गोवंश मांस आढळले.

मोकळ्या जागेत सात गोवंश जनावरे बांधलेली आढळली. पोलिसांनी कारवाई करत जनावरांची सुटका केली. ५०० किलो गोवंश मांस आणि कुऱ्हाड, सुरा यांसह विविध साहित्य असा सुमारे २ लाख ७० हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. फिरोज अब्दुल मजीद कुरेशी (वय ४२,रा. सादिक नगर), कलिम सलीम शेख (वय ३२, रा. कथडा) अशा दोघांना ताब्यात घेतले आहे. तर एक जण पळून जाण्यास यशस्वी झाला. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT