Nashik Crime News : दहशत पसरविणारे चौघे तडीपार; ध्रुव नगरला केली होती वाहनांची तोडफोड

Nashik Crime : दगडफेक करीत वाहनांची तोडफोडप्रकरणी चार संशयितांना शहर-जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार केले आहे.
The four suspects who spread terror by vandalizing the vehicles have been nabbed, including the Gangapur police station team.
The four suspects who spread terror by vandalizing the vehicles have been nabbed, including the Gangapur police station team.esakal

Nashik Crime News : ध्रुवनगर येथील एका शाळेजवळ मध्यरात्रीच्या सुमारास लाठ्या-काठ्या अन्‌ दगडफेक करीत वाहनांची तोडफोडप्रकरणी चार संशयितांना शहर-जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार केले आहे. ही घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. दरम्यान, शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी व समाज कंटकांना प्रतिबंधासाठी आयुक्त संदीप कर्णिक यांनी आक्रमक भूमिका घेत या कारवाईने शहरातील सराईत गुंड व टवाळखोरांना इशाराच दिला आहे. (nashik crime marathi news)

गौरव संजय जाधव (२०, रा. शिंदे चाळ, ध्रुव नगर), अक्षय गोपाल जाधव (२३, रा. हनुमान नगर, कॅनॉलरोड, ध्रुव नगर), दर्शन दीपक साळवे (१९, रा. सप्तशृंगी मंदिराजवळ, ध्रुव नगर), सखाराम बापू काकडे (२३, रा. सप्तशृंगी मंदिराजवळ, ध्रुव नगर) अशी तडीपार केलेल्या सराईतांची नावे आहेत.

संशयित गौरव जाधव हा या टोळक्याचा प्रमुख असून, या संशयितांनी ४ डिसेंबर २०२३ च्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास संगनमताने परिसरामध्ये दहशत माजविण्यासाठी लाठ्या-काठ्या आणि दगडांनी परिसरातील गाड्यांची तोडफोड केली. यात कार (एमएच ०२ सी डब्ल्यु ८९२२), कार (एमएच ४१ व्ही ५२६१), स्कूल व्हॅन (एमएच १५ एफव्ही ७०६५) या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले होते.

The four suspects who spread terror by vandalizing the vehicles have been nabbed, including the Gangapur police station team.
Nashik Crime News: खून झालेल्या युवकाची पटली ओळख; गंगापूर पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू

या प्रकरणी गंगापूर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल होऊन अटक केली होती. यातील संशयित अक्षय जाधव व सखाराम काकडे यांच्याविरोधात यापूर्वीच मालमत्तेच्या नुकसानीचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिस आयुक्त कर्णिक यांनी शहराच्या शांततेचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी चौघांची शहर-जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपारी केली आहे. येत्या काही दिवसांत शहरातील आणखीही सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीसह स्थानबद्धतेच्या कारवाया करणार असल्याचे संकेत पोलिस आयुक्तालयाने दिले आहेत. ( latest marathi news )

The four suspects who spread terror by vandalizing the vehicles have been nabbed, including the Gangapur police station team.
Nashik Crime News : इंस्टाग्राम अकाउंटवरील फॉलोवर्सद्वारे आरोपी ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com