Crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : ‘ॲमेझॉन’च्या कॅशवर सुरक्षारक्षकाचाच डल्ला; संशयित रोकड घेऊन पसार

Nashik Crime : अशोका मार्ग परिसरातील ॲमेझॉन कंपनीच्या गुदामात सुरक्षारक्षकाने कस्टडी लॉकरमधून साथीदाराच्या मदतीने ८ लाख ५७ हजार रुपयांची रोकड चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : अशोका मार्ग परिसरातील ॲमेझॉन कंपनीच्या गुदामात सुरक्षारक्षकाने कस्टडी लॉकरमधून साथीदाराच्या मदतीने ८ लाख ५७ हजार रुपयांची रोकड चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजवरून सुरक्षारक्षकांच्या साथीदाराला शिताफीने अटक केली, तर मुख्य संशयित सुरक्षारक्षक सहा लाखांची रोकड घेऊन पसार झाला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (Nashik Crime security guard stole money from custody locker in warehouse of Amazon company)

रामदास संतू टेमगर (४३, रा. राणी लक्ष्मीबाई रोड, विहीतगाव) असे मुख्य संशयित सुरक्षारक्षकाचे नाव असून, त्याचा साथीदार आदिल जमील सय्यद (३८, रा. अंजुमन उर्दू शाळेजवळ, गोसावीवाडी, नाशिकरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. रोहित देवरे (रा. त्रिमूर्ती अव्हेन्यू, कालिका पार्क, उंटवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित टेमगर हा सुरक्षा पुरविणाऱ्या जीफोरएस कंपनीचा सुरक्षा रक्षक आहे.

अशोका मार्ग येथे ॲमेझॉन कंपनीचे गुदाम आहे. शुक्रवारी (ता. ८) पहाटे दोन ते पाचच्या दरम्यान, संशयित टेमगर याने साथीदार आदिल सय्यदच्या मदतीने गोदामातील कॅश रूमची चावी घेऊन सेफ कस्टडीचे लॉकर उघडले आणि त्यातील ८ लाख ५७ हजार रुपयांची रोकड चोरून साथीदार सय्यदकडे दिली. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गोदामातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता. (latest marathi news)

त्यात दोन्ही संशयितांची ओळख पटली. अंमलदार राजेश राठोड यांना संशयित सय्यद गोसावीवाडीत येणार असल्याची खबर मिळताच सापळा रचून त्यास अटक केली. त्याच्याकडून १ लाखांची रोकड व मोबाईल असा १ लाख १५ हजारांचा ऐवज जप्त केला. तर मुख्य संशयित व सुरक्षारक्षक टेमगर हा उर्वरित रक्कम घेऊन पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

ही कामगिरी आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, चेतन श्रीवंत, सुगर साबरे, देविदास ठाकरे, शरद सोनवणे, महेश साळुंके, अप्पा पानवळ, राजेश राठोड, अमोल कोष्टी, समाधान पवार यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा कायम! पुढचे काही दिवस पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज काय?

Karnataka Accident: राज्यात दोन अपघातांत सात जण ठार; कोलार, चिक्कबळ्ळापुरात दुर्घटना, तिरुपतीहून परतताना काळाचा घाला

IND vs AFG : अफगाणिस्तानच्या 'त्या' कृतीने पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या! भारताचा नकाशा अन् जगासमोर आणले सत्य… नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : BMCची उधळपट्टी, ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च

Shaktipeeth Highway: 'कोणाचा बाप आला तरी जमिनी देणार नाही’; शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, मोजणीच्या नोटिसींची होळी

SCROLL FOR NEXT