Nashik Crime News : रविशंकर मार्ग येथे गोळीबार; एक जण ठार

Nashik Crime : महादेव सोसायटीमध्ये आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून एकाने थेट गोळीबार करीत एकाचा खून केल्याने खळबळ उडाली आहे.
Crime
Crimeesakal

Nashik Crime News : नाशिक-पुणे रस्त्यावरील विजय-ममता थिएटर परिसरातील रविशंकर मार्ग येथे रविवारी (ता. १०) रात्री साडेनऊच्या सुमारास महादेव सोसायटीमध्ये आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून एकाने थेट गोळीबार करीत एकाचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. अचानक घडलेल्या या घटनेने सोसायटीतील रहिवाशांसह परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. (Nashik Crime direct firing over financial exchange dispute)

माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबारात जखमी अमोल काठे याला रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी एक संशयिताला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेने शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला असून, गुन्हेगारांना गावठी कट्टे सहज उपलब्ध होत असल्याचे दिसून येते.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि काही प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार रविशकर मार्गावर महादेव सोसायटी आहे. रविवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास सोसायटीतील रहिवाशांना पार्किंगमध्ये जोरजोरात भांडणाचा आवाज येत असल्याने त्यांनी थेट पोलिसांना ही घटना कळविली. तोच पुन्हा जोराचा आवाज आल्याने काही लोक खाली आले.

तोपर्यंत पोलिस घटनास्थळी पोचले होते. पोलिस आल्यानंतर त्यांना घटनास्थळी अमोल काठे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. पोलिसांनी त्याला त्वरित रुग्णालयात हलविले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अधिक माहितीअंती पोलिसांनी संशयित म्हणून कुंदन गदे याला ताब्यात घेतले असून, तोही जखमी झाला असून, त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (latest marathi news)

Crime
Nagpur Crime: कारागृहातून सुटले, घरफोडी करायला लागले...दोघांना अटक ; सहा गुन्ह्यांचा उलगडा

सदरची घटना आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. महादेव सोसायटी येथे अमोल काठे आणि कुंदन गदे या दोघांमध्ये वाद झाल्याने कुंदनने त्याच्याकडील पिस्तुलातून काठे यांच्यावर चार राउंड फायर केले. त्यामुळे अमोल काठे जागीच कोसळला, असे काहींनी सांगितले.

घटनेनंतर परिसरात गर्दी झाली होती. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सपकाळे, शहर गुन्हेशाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड आदी घटनास्थळी दाखल झाले असून, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर

शहरात काही दिवसांपासून गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. रविवारी सकाळी पंचवटीत एका फिरस्त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडून बारा तास उलटत नाही तोच उपनगर हद्दीमध्ये थेट गोळीबाराची घटना घडली. यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचे दिसून येते.

अनेकांना गावठी कट्टे सहज मिळत असून, शहरात किती जणांकडे गावठी कट्टे असून, ते राजरोसपणे फिरत आहेत याची गणना नाही. शिवाय नवीन वाढणाऱ्या वसाहतीत मोठ्या प्रमाणावर परराज्यातील लोक येत असून, त्याबाबत स्थानिक पोलिस यंत्रणाही अनभिज्ञ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, रविशंकर मार्ग परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Crime
Mangalwedha Crime : दिव्यांग महिलेवर अत्याचार, आरोपीच्या अटकेसाठी आंदोलनाचा प्रहारचा इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com