Court Order esakal
नाशिक

Nashik Crime News : सावत्र बापाला अत्याचारप्रकरणी जन्मठेप! जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा

Crime News : तसेच, २० हजारांचा दंड केला आहे. याप्रकरणी २०१८ मध्ये उपनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : अवघ्या १० वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणार्या सावत्र बापाला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच, २० हजारांचा दंड केला आहे. याप्रकरणी २०१८ मध्ये उपनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. (Step father sentenced to life imprisonment in torture case)

सुनील टिप्पा पंथीकर (३७, रा. टागोरनगर) असे जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, ती १० वर्षांची असताना आरोपी सावत्र बापाने तिच्यावर २००९ ते २०१८ पर्यंत लैगिंक अत्याचार केले होते.

पीडितेची आई कामावर गेल्यानंतर सावत्र बाप तिच्यावर अत्याचर करायचा. याप्रकरणी ऑगस्ट २०१८ मध्ये उपनगर पोलिसात पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहायक निरीक्षक संध्या तेली यांनी गुन्ह्याचा तपास करीत आरोपीविरोधात सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. (latest marathi news)

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायधीश श्रीमती व्ही.एस. मलकापट्टे-रेड्डी यांच्यासमोर झाली. यादरम्यान, सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती सुलभा सांगळे यांनी कामकाज पाहताना पीडितेची आईच फितुर झाली होती.

तरीही सबळ पुराव्यांत आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व २० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एस.एन. जगताप, तनजीम खान, दिनकर खैरनार यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दिवाळीआधी सोनं 7 हजारांनी स्वस्त! जळगावच्या सुवर्ण बाजारातही सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; आजचा ताजा दर किती?

Kieron Pollard Mumbai Indians New Head Coach : ट्वेंटी-२०त १५००० धावा अन् ३४१ विकेट्स... मुंबई इंडियन्सकडून नव्या प्रशिक्षकाची घोषणा; कोण आहे जयवर्धनेचा उत्तराधिकारी?

प्रभासच्या 'फौजी' चित्रपटात झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; सध्या गाजवतोय झी मराठीची मालिका, पाहून प्रेक्षक खुश

Crime News: गँगस्टर हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपुरिया अमेरिकेत FBI कडून अटक; भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?

SCROLL FOR NEXT