Dhule Crime News: बाळ रडलं अन्‌ एटीएमची चोरी टळली! बोराडी येथील घटना; सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Crime News : बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करतानाच गल्लीत मोठा आवाज झाला. स्थानिकांनी बाहेर जाऊन पाहिले असता रस्त्यावर पडलेल्या एटीएम मशीनशी झटापट करताना काहीजण दिसले अन...
Boradi (T. Shirpur) ATM machine dragged away by thieves. In the second photograph, the police inspecting the scene of the incident.
Boradi (T. Shirpur) ATM machine dragged away by thieves. In the second photograph, the police inspecting the scene of the incident.esakal
Updated on

शिरपूर : घरातील बाळ मध्यरात्री अचानक रडू लागले. त्यामुळे घरातल्या लोकांना जाग आली. बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करतानाच गल्लीत मोठा आवाज झाला. स्थानिकांनी बाहेर जाऊन पाहिले असता रस्त्यावर पडलेल्या एटीएम मशीनशी झटापट करताना काहीजण दिसले. बघ्यांनी बोंब ठोकताच एटीएम फोडण्यासाठी आलेले संशयित वाहनासह फरार झाले. केवळ बाळ रडल्याने ३१ लाखांची रोकड चोरी होण्यापासून वाचली. (Dhule Crime Baby cried ATM theft averted incident at Boradi)

बोराडी (ता. शिरपूर) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन काढून पळवण्याचा प्रयत्न शुक्रवारी (ता.१९) मध्यरात्री अज्ञात संशयितांनी केला. सोबत आणलेल्या क्रूझर जीपचा वापर करुन एटीएम मशिन सेंटरमधून ओढून काढले. ते वाहनात टाकण्याचा प्रयत्न करीत असतानाच बाळ रडले यातच मोठा आवाज झाल्याने नागरिक जमा झाल्याने चोरट्यांना मशिन सोडून पळ काढण्याची वेळ आली.

बोराडी येथील बस स्टँडसमोर विठ्ठल जगताप यांच्या मालकीच्या जागेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. दिवसभरातील व्यवहारानंतर मशीनमध्ये एकूण ३१ लाख ६८ हजार ८०० रुपये शिल्लक होते. रात्री सव्वादोनला क्रूझर जीपमधून आलेले संशयित तेथे गेले. त्यांनी एटीएम मशिन क्रूझरला बांधून बाहेर ओढून काढले.

ते उचलून क्रूझरमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरु असताना विठ्ठल जगताप यांच्या घरातील बाळ अचानक रडू लागले. त्यामुळे घरातील लोकांना जाग आली. त्याचवेळी घराबाहेर मोठा आवाज येऊ लागल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिल्यावर एटीएम चोरीचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरड केल्याने इतर शेजारीही घराबाहेर पडू लागले. त्यांना पाहून संशयितांनी आणलेल्या क्रूझर वाहनात बसून पळ काढला.

दरम्यान, इलेक्ट्रॉनिक पेमेंट सेवा पुरवठादार कंपनीचे व्यवस्थापक प्रवीण पाठक यांना मुंबईच्या कंपनी मुख्यालयातून रात्री अडीचला बोराडी येथे एटीएम चोरीचा प्रयत्न सुरु असल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यांनी पोलिसांना तातडीने माहिती दिली. (latest marathi news)

Boradi (T. Shirpur) ATM machine dragged away by thieves. In the second photograph, the police inspecting the scene of the incident.
Nashik Crime News : चोरट्यांनी 3 फ्लॅटचे कडीकोयंडे तोडून घरफोड्या! 3 लाखांचा मुद्देमाला लंपास

त्यानंतर पोलिस उपअधीक्षक भागवत सोनवणे, सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ व सहकारी घटनास्थळी पोचले. त्यानंतर सकाळी बँकेचे व पुरवठादार कंपनीचे अधिकारी यांनी बोराडीला जाऊन पाहणी केली असता ३१ लाखांची रोकड सुरक्षित असल्याचे आढळले.

एटीएमवर संक्रांत

तालुक्यामध्ये संशयितांनी एटीएम केंद्रांना लक्ष्य केल्याचे सातत्याने घडणाऱ्या घटनावरुन दिसून आले आहे. ३० जूनला मध्यरात्री शहरातील रसिकलाल पटेल नगर येथील एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला.

चार जुलैला सावळदे (ता. शिरपूर) येथील महामार्गालगतचे एटीएम फोडून चोरट्यांनी १० लाखांची रोकड लंपास केली. या घटनेत संशयितांनी एटीएम पेटवून दिले. त्यानंतर बोराडीत चक्क एटीएम मशिन चोरण्याचा प्रयत्न झाला. गतवर्षी तीन जुलैलाही याच एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न झाला होता.

Boradi (T. Shirpur) ATM machine dragged away by thieves. In the second photograph, the police inspecting the scene of the incident.
Crime News : विद्यार्थ्याने विळ्याने चिरला स्वत:चा गळा! काय आहे कारण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com