Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट! दुचाकी, चारचाकींसह रिक्षा चोरीचे प्रकार उघडकीस

Crime News : शहरातील सोसायट्या, सार्वजनिक ठिकाणांवर उभ्या असलेल्‍या वाहनांवर चोरट्यांचा डोळा असल्‍याचे समोर येते आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरातील सोसायट्या, सार्वजनिक ठिकाणांवर उभ्या असलेल्‍या वाहनांवर चोरट्यांचा डोळा असल्‍याचे समोर येते आहे. गुरुवारी (ता. २५) विविध पोलिस ठाण्यांमध्ये तीन दुचाकी, एक चारचाकीसह रिक्षा चोरीचे गुन्‍हे दाखल करण्यात आले आहेत. (Nashik Crime Vehicle thieves on rise in city news)

दुचाकी चोरीतील पहिल्‍या घटनेत गंगापूर रोडवरील शहीद चित्ते पूल (बापू पूल) परिसरात गुरुवारी (ता. २५) रात्री आठच्‍या सुमारास दुचाकी चोरीस गेली. गोदापार्क परिसरात उभी केलेली दुचाकी चोरीस गेल्‍याची फिर्याद विशाल शैलेश घाडगे या युवकाने म्‍हसरूळ पोलिस ठाण्यात दिली आहे.

दुसऱ्या घटनेत पळसे येथील जुना कारखाना रोडवर २१ एप्रिलला मध्यरात्रीतून ५० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीस गेली. याप्रकरणी पंढरीनाथ केरू पाटील यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिसऱ्या घटनेत त्र्यंबक रोडवरील चंद्रभागा लॉन्‍स येथील वाहनतळावरून दुचाकी वाहन चोरीस गेले. २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीस गेल्‍याची फिर्याद हर्शद महाजन यांनी सातपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. (Latest Marathi News)

तर चारचाकी वाहन चोरीची घटना जुने नाशिक भागातील कोकणीपुरा येथे घडली आहे. बुधवारी (ता. २४) मध्यरात्री या परिसरातून चारचाकी वाहन चोरीस गेले. तीन लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची स्‍विफ्ट कार चोरीस गेल्‍याची फिर्याद कैसर कोकणी यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात दिली आहे.

तर भद्रकालीतील तलावडी भागातून बुधवारी (ता. २४) रात्री अकराच्‍या सुमारास रिक्षा चोरीला गेली. ५० हजार रुपये किमतीची रिक्षा चोरीस गेल्‍याची फिर्याद अजीज शेख यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी संशयित मेहबूब शेख यास गुरुवारी (ता. २५) रात्री अकराच्‍या सुमारास अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : बॉलीवूड अभिनेता डिनो मोरियाची 6 तास 45 मिनिटं चौकशी

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT