Crime News: कानात इअरफोन, हेल्मेट नाही! स्कूटरवरुन जाणाऱ्या 28 वर्षीय महिलेच्या मोबाईलचा स्फोट झाला अन्

UP Kanpur Woman Dies: पॉकेटमधील मोबाईल फोनचा स्फोट झाल्याने स्कूटरवरुन जाणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
 Mobile Phone Blasts
Mobile Phone Blasts

लखनऊ- उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पॉकेटमधील मोबाईल फोनचा स्फोट झाल्याने स्कूटरवरुन जाणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. महिला स्कूटरवरुन जात होती, त्यावेळी अचानक तिच्या पॉकेटमधील मोबाईलचा स्फोट झाला. यामुळे महिलेचे स्कूटरवरील नियंत्रण सुटले अन् ती दुभाजकाला जाऊन जोरात धडकली. (Mobile Phone Blasts While Riding Scooter)

मिळालेल्या माहितीनुसार, स्कूटर महिलेच्या डोक्यावर पडली. महिलेने हेल्मेट घातलेला नव्हता. त्यामळे तिला गंभीर दुखापत झाली होती. महिलेच्या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली आणि महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, महिलेला गंभीर इजा झाल्याने तिचा जीव वाचू शकला नाही. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ( UP Woman Dies)

 Mobile Phone Blasts
Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ कायम ; वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन जणांची ६५ लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला स्कूटरवरुन बुधवारी सकाळी दहा वाजता कानपूरकडे निघाली होती. मृत महिलेचे नाव पूजा (वय २८) असं आहे. ती फरुक्काबाद जिल्ह्यातील नेहरारिया गावातील रहिवाशी आहे. 'फ्री प्रेस जनरल'च्या रिपोर्टनुसार, महिला कानपूर रेल्वे स्टेशनकडे निघाली होती, तेथून ती मुंबईकडे जाणारी ट्रेन पकडणार होती. पण, ती स्टेशनवर पोहोचण्याआधीच तिचा अपघात झाला.

 Mobile Phone Blasts
Nashik Crime News : चाडेगावात एकावर ‘फायर’! युवक जखमी; गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार पसार

कानपूर-अलीपूर हायवेवरील मनपूर गावातील पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला. महिलेने हेल्मेट घातला नव्हता, शिवाय तिच्या कानामध्ये इअरफोन होता. तसेच महिला स्पीडमध्ये स्कूटर चालवत होती. त्यामुळे जेव्हा ती पडली तेव्हा तिला जब्बर मार बसला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की याप्रकरणी तपास सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com