Vikas Sawant, Sunanda Sawant, Meenakshi Hire  esakal
नाशिक

Nashik Accident News : पित्याचा मृतदेह घेऊन निघाले, लेकींसह जावयालाच मृत्यूने गाठले!

Nashik News : मालेगाव महामार्गावर झालेल्या अपघातात शिक्षक दांपत्यासह महिलेच्या अपघाती मृत्यूने मालेगाव हळहळले. मृत दोन्ही महिला सख्ख्या बहिणी आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : महामार्गावर झालेल्या अपघातात शिक्षक दांपत्यासह महिलेच्या अपघाती मृत्यूने मालेगाव हळहळले. मृत दोन्ही महिला सख्ख्या बहिणी आहेत. वडिलांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या मुली व जावयावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. येथील कॅम्प भागातील ८६ वर्षीय मोतीराम रूपा पवार यांना चार महिन्यांपूर्वी पक्षघात झाला होता. (Nashik Accident News)

त्यांचा मोठा मुलगा राजेंद्र पवार मानूर (कळवण) येथे प्राचार्य आहेत. कुटुंबीयांनी मोतीराम पवार यांना मालेगाव, नाशिक, मुंबई, राजस्थान यांसह अनेक ठिकाणी उपचारासाठी नेले. ठाणे भागात शिक्षिका असलेली मुलगी सुनंदा ऊर्फ अनिशा व जावई विकास सावंत यांनी त्यांना पाच ते सहा दिवसांपूर्वी उपचारासाठी ठाणे येथे नेले होते.

बुधवारी (ता. १०) रात्री साडेदहाला मोतीराम यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांना रुग्णवाहिकेने मालेगावकडे आणले जात होते. रुग्णवाहिकेत पवार यांची पत्नी व लहान मुलगा होता. तर सावंत शिक्षक दांपत्य व तसेच नाशिक येथील नात वैभवी जाधव कारमध्ये होती. मोतीराम पवार यांचा मृतदेह घेऊन येणारी रुग्णवाहिका व नातेवाइकांची कार पाठोपाठ मालेगावकडे येत होती.

प्राचार्य पवार नाशिकला राहत असून, तेही पाठीमागून त्यांच्या वाहनातून मालेगावकडे निघाले होते. सर्व जणांनी चांदवड येथे चहा घेतल्यानंतर मोठी बहीण मीनाक्षी हिरे या लहान बहीण सुनंदा व विकास सावंत यांच्या कारमध्ये बसल्या. (latest marathi news)

वाके शिवारात न्यू बाबा हॉटेलसमोर कंटेनरला जबर धडक दिल्याने चौघांच्या डोक्याला मार लागल्याने दोघी सख्ख्या बहिणी व मेहुणा जागीच ठार झाले. वैभवी गंभीर जखमी आहे. तिच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. ठाकुर्ली टिटवाळा येथे सुनंदा सावंत व विकास सावंत हे दोघेही शिक्षक आहेत. या दांपत्याला १८ वर्षांची मुलगी आहे.

ती बारावीत शिक्षण घेत असून, सावंत यांनी त्यांच्या मुलीला तिच्या आजीकडे सोडले होते. मोतीराम पवार यांच्यावर मालेगाव येथील शिवाजीनगरातील स्मशानभूमीत, मीनाक्षी हिरे यांच्यावर निमगाव येथे, तर सुनंदा सावंत व विकास सावंत यांच्यावर ठाकुर्ली टिटवाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT