Nashik Excise Vehicle Accident Case: अपघात करून पसार मद्यतस्कर कोर्टात हजर! गुजरातमधून संशयितास अटक; 2 वाहने जप्त

Crime News : हरनुल शिवारात मद्यतस्करी करणाऱ्या क्रेटा कारचालकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला धडक दिली. यात ते वाहन रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पटली झाल्याने एक्साईजे अंमलदार जागीच ठार तर तिघे अंमलदार जखमी झाले होते.
A team of Nashik Rural Local Crime Branch along with two suspected liquor smugglers.
A team of Nashik Rural Local Crime Branch along with two suspected liquor smugglers.esakal

Nashik Excise Vehicle Accident Case : सोमवारी (ता. ८) पहाटे दोनच्या सुमारास लासलगाव - चांदवड रस्त्यावर पाठलाग सुरू असताना, हरनुल शिवारात मद्यतस्करी करणाऱ्या क्रेटा कारचालकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला धडक दिली. यात ते वाहन रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पटली झाल्याने एक्साईजे अंमलदार जागीच ठार तर तिघे अंमलदार जखमी झाले होते.

याप्रकरणात संशयित क्रेटा कारचा चालक चांदवड न्यायालयात हजर झाला असून, ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी आणखी एकाला गुजरातमधून अटक केली आहे. यात दोन क्रेटा कारही जप्त करण्यात आल्या असून, आणखी सात ते आठ मद्यतस्करी करणाऱ्या कारसह संशयितांचा शोध ग्रामीण पोलीस घेत आहेत. दरम्यान, संशयित दोघांना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Nashik Excise Vehicle Accident Case absconded liquor trafficker arrested from Gujarat)

क्रेटा कारचालक देविश कांतीलाल पटेल (३७, रा. चिंचवाडा, ता.जि. वलसाड, गुजरात), अश्पाक अली मोहम्मद शेख (२२, रा. युनिक अपार्टमेंट, दर्गारोड, नवसारी, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी पत्रकार परिषद घेत सदरील गुन्ह्यातील तपासाची माहिती दिली.

एक्साईजच्या पथकाला रविवारी (ता.७) रात्री ८ ते १० कारमधून अवैधरित्या मद्याची तस्करी सिल्वासा येथून मुंबई-आग्रा महामार्गाने सुरतकडे केली जाणार असल्याची खबर होती. त्यासाठी गरवारे पॉईंट, द्वारका, आडगाव नाका याठिकाणी नाकाबंदी करून सापळाही रचला होता.

परंतु संशयित क्रेटा कार (जीजे १९ डीई ८८८६) चालकाने आडगाव नाक्यावरून कार छत्रपती संभाजीनगर रोडने निफाडकडून लासलगाव मार्गे नेले. त्यावेळी एक्साईजच्या वाहनाने पाठलाग सुरू केला होता. लासलगावमध्ये त्या वाहनाला रोखण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु ते रेल्वे फाटक येथून निसटले होते. या कारवाईत एक्साईजने लासलगाव पोलिसांच्या दोघा अंमलदारांना सामावून घेतले होते.

परंतु पुढे हरनुल शिवारात बंद टोलनाक्याजवळ संशयित चालकाने एक्साईजच्या वाहनाला जाणीवपूर्वक धडक देत पसार झाला होता. या अपघातात एक्साईजचे वाहनचालक कैलास कसबे गंभीर जखमी होऊन ठार झाले तर एक एक्साईज व दोन पोलीस अंमलदार जखमी झाले होते. याप्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी कसून तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांची पथके गुजरातमध्ये संशयिताच्या मागावर पोहोचली. तर दुसरीकडे क्रेटा कारचा संशयित चालक देवीश पटेल हा चांदवड न्यायालयात स्वत:हून हजर झाला. तर दुसरा संशयित अश्पाक शेख यास पोलिसांनी गुजरातमध्ये अटक केली. (latest marathi news)

A team of Nashik Rural Local Crime Branch along with two suspected liquor smugglers.
Two Naxalite Surrender : गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवादी महिलांचे आत्मसमर्पण; प्रत्येकी आठ लाखांचं होतं बक्षीस

शेख हा दुसऱ्या क्रेटा कारमधून त्याच्य सासऱ्यासमवेत होता. दोन क्रेटा कार जप्त करण्यात आल्या आहेत. सदरची कामगिरी अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, उपनिरीक्षक कांभिरे, शिरोळे, ठोंबरे, सानप, खराटे, जगताप, वराडे, बहिरम, गिलबिले यांच्या पथकाने बजावली.

तस्करीसाठी कार अन्‌ महामार्ग सेफ ऑप्शन

अवैध मद्यतस्करांनी गेल्या जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून गुजरातच्या दिशेने अवैध मद्याची तस्करी सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गाची निवड केली. तसेच, कारचा वापर केला. महामार्गाने कारचे प्रमाण अधिक असल्याने पोलीस वा एक्साईजकडून नाकाबंदी होत नाही.

त्यामुळे तस्करांनी सेफ ऑप्शन म्हणून महामार्गावरून क्रेटा, नेस्कॉन, हायर अशा ८ ते १० कारमधून मद्याची तस्करीचा कट रचलेला होता. यापैकी काही कारमधूनच मद्याची तस्करी केली जात होती तर दुसऱ्या कार या सपोर्टला असल्याचेही तपासातून समोर आले आहे.

"या गुन्ह्यातून मद्यतस्करांची पाळेमुळे पोलीस खोदून काढतील. अवैध मद्य कोठून आणि कोणाकडून घेतले. तसेच, गुजरातमध्ये कोणाला देणार होते, याचा मुख्य सूत्रधार कोण याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यासंदर्भातील तांत्रिक विश्लेषणानुसार तपास सुरू आहे."

- विक्रम देशमाने, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.

A team of Nashik Rural Local Crime Branch along with two suspected liquor smugglers.
Lokayukta Raid : 11 सरकारी अधिकाऱ्यांवर लोकायुक्तांचे छापे; सोने, रोकडसह मालमत्ता जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com