nashik Lok Sabha Election esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : निवडणुकीचे नक्की कोणते काम स्वीकारायचे? निवडणूक शाखेतील सावळा गोंधळ

Lok Sabha Election : जिल्हा निवडणूक शाखेने लोकसभा निवडणूक कामकाजासाठी सर्वच शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांसाठी आदेश काढले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : जिल्हा निवडणूक शाखेने लोकसभा निवडणूक कामकाजासाठी सर्वच शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांसाठी आदेश काढले आहेत. मात्र, यात जिल्हा परिषदेतील एकेका कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजासाठी दोन-दोन, तीन-तीन आदेश काढण्यात आले आहेत. एकाचवेळी दिंडोरी व नाशिक लोकसभा निवडणुकांसाठी हे आदेश असल्याने कर्मचारीही चाट पडले आहेत. (nashik District Election Branch has issued orders for employees of all government offices for Lok Sabha election work marathi news)

त्यामुळे नेमके कोठे काम करायचे, असा पेच कर्मचाऱ्यांपुढे उभा राहिला आहे. यानिमित्ताने निवडणूक शाखेतील सावळा गोंधळ समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचारी वर्गाने ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्हा निवडणूक शाखेकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी व धुळे अर्धा असे अडीच मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात निवडणूक यंत्रणा राबविण्यासाठी कर्मचारीही मोठ्या प्रमाणावर लागणार असल्याने निवडणूक शाखेने सर्वच शासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना यात सामावून घेत, कामकाजाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शाखेकडून कर्मचाऱ्यांवर निवडणूक कामकाजाबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. (latest marathi news)

यात जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही आदेश प्राप्त झाले आहेत. मात्र, जिल्हा परिषदेतील एकाच कर्मचाऱ्याला नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकांची जबाबदारी दिल्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही कर्मचाऱ्यांना, तर तीन-तीन ठिकाणी एकाचवेळी आदेश प्राप्त झाले आहेत. नाशिक व दिंडोरी मतदारसंघांसाठीचे हे आदेश आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कुठे काम करावे, असा प्रश्न पडला आहे.

निवडणूक शाखेचा सावळा गोंधळ

संबंधित आदेश नाशिक, दिंडोरी निवडणूक अधिकारी यांच्या स्वाक्षरीने निघाले आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांची नियुक्ती यादी ही संबंधित विभागाकडून जात असते. ही यादी निवडणूक शाखेत गेल्यानंतर दोन्ही मतदारसंघांसाठी कर्मचाऱ्यांची जबाबदारी ठरविताना एकाच कर्मचाऱ्याचे नाव दोन्ही यादीत आहे. त्यामुळे एकाच कर्मचाऱ्याला दोन आदेश प्राप्त झाले आहेत. शाखेतील कर्मचाऱ्यांमधील असंवाद, असमन्वयाचा हा अभाव असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Amba Ghat Road Repair : आंबा घाटात आधुनिक एरडॉक्स प्लेटस्‌चा वापर; खचलेल्या भागात 30 मीटर लांब, 5 मीटर उंच भिंत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT