Nashik Lok Sabha Election : नाशिक मतदारसंघात आता तिघांत चौथा; लोकसभेसाठी मनसेनेही थोपटले दंड

Lok Sabha Election : ‘नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदार कमळाचाच’ असा नारा भारतीय जनता पक्षाने दिला तर‘नाशिकचा खासदार शिंदे सेनेचाच’ असा दावा करण्यात आला.
Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Electionesakal

Nashik Lok Sabha Election : ‘नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदार कमळाचाच’ असा नारा भारतीय जनता पक्षाने दिला तर‘नाशिकचा खासदार शिंदे सेनेचाच’ असा दावा करण्यात आला. नाशिकच्या जागेसाठी अजित पवार गटाची राष्ट्रवादी कॉंग्रेस देखील आघाडीवर असताना आता नाशिकच्या जागेवर दावा सांगणारा तिघांत आणखी चौथा आला आहे. महायुतीत नव्याने सामील होत असलेल्या मनसेने दंड थोपटले आहे. (Nashik constituency now fourth out of three Lok Sabha election marathi news)

नाशिकची जागा मनसेलाच सोडण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागा महायुतीत भाजपला सोडावी की शिंदे गटाला यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करीत व नाशिकचा खासदार कमळाचाच अशी जोरदार घोषणा देत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला.

दुसरीकडे शिंदे सेनेनेदेखील नाशिकवर दावा केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एका मेळाव्यात नाशिकची जागा शिंदे सेनाच लढवणार व पुन्हा आमच्याच पक्षाचा खासदार निवडून येणार असल्याचा दावा केला. त्यानंतर भाजपमध्ये नाराजी व्यक्त झाली. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार असल्याने नाशिकच्या जागेवर अजित पवार गटाचाच उमेदवार उभा राहील, असा पवित्रा राष्ट्रवादीकडून घेण्यात आला.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचे सांगताना जागा आम्हालाच मिळेल असा दावा केला. भाजप, शिंदे सेना व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात नाशिकच्या जागेवरून वाद सुरू असताना आता महायुतीत नव्याने सामील झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील उडी घेतली.(latest marathi news)

Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : लोकशाही टिकविण्यासाठी ही निवडणूक महत्वाची : वरूण सरदेसाई

खासदार मनसेचाच

महायुतीत मनसेला सामावून घेतले जाणार आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत नुकतीच भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रात दोन जागा मनसेसाठी सोडण्याची तयारी झाल्याचे समजते. त्याच अनुषंगाने नाशिकमधून मनसेला उमेदवारी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. नाशिकमध्ये यापूर्वी शहरातून तीन आमदार मनसेचे निवडून आले आहेत.

तर महापालिकेतदेखील पाच वर्षे मनसेची सत्ता होती. जिल्हा परिषदेचे चार सदस्य तसेच पंचायत समित्यांवर देखील मनसेचे वर्चस्व आहे. ग्रामीण भागात देखील मनसेचे कार्यक्षेत्र वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभेची जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडण्याचा आग्रह पक्षाच्या श्रेष्ठींकडे धरला जाणार आहे.

''नाशिक मनसेचा बालेकिल्ला आहे. यापुर्वी तीन आमदार,चाळीस नगरसेवक निवडून दिले आहे. त्यामुळे नाशिकची जागा महायुतीत मनसेला मिळाली पाहीजे.''- सलीम शेख, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे

''शहरी भागाबरोबरच मनसेची ताकद ग्रामीण भागातही वाढली आहे. त्यामुळे महायुतीचा घटक पक्ष म्हणून मनसेला नाशिकची जागा मिळाली पाहीजे.''- पराग शिंत्रे, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे

Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : काँग्रेसच्या मैदानात शिवसेनेचा चौकार; नाशिक लोकसभा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com